पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पावलावर पाऊल ठेवून संघटना वाढीसाठी कार्य जोरात सुरू

23

✒️भंडारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भंडारा(दि.१७ ऑगस्ट):- दलित पँथर सामाजिक संघटना जिल्हा भंडारा तर्फे जिल्हा परिषद महाविद्यालय आंधळगांव तालुका मोहाडी जिल्हा भंडारा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.घनःशाम भोसले होते.

प्रास्ताविक दलित पँथरचे भंडारा जिल्हा अध्यक्ष राहुल वानखेडे यांनी केले तर यावेळी श्रीकांत येरपूडे, राजु मते, प्रदिप बुराडे , जिल्हा महिला प्रदेश अध्यधा सौ कविता भोंदे यांचे भाषण झाले अध्यक्षीय भाषण करताना डाॅ.घनःशाम भोसले साहेबांनी हि संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असुन संपूर्ण समाजातील लोकांसाठी असून शोषीत,पिडीत, दलित अनन्यसाधारण लोकांसाठी काम करीत असून पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पावलावर पाऊल ठेवून संघटना वाढीसाठी कार्य जोरात सुरू आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित अरविंद कारेमोरे, आकाश बोंदरे,अजेश मेश्नाम, गणेश गोरे मा.सरपंच, लक्ष्मण ऊके, विजय फुले, हरबा महाराज, ईटनकर मुख्याधापक, नारनवरे सर, चक्रधर मेश्राम हजर होते तर सुत्र संचालन अमित खोब्रागडे केले तर आभार सुखदेवेसर भंडारा रोड यांनी केले.