प्रा.शा.गणगेवाडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त केला गुणवंतांचा सन्मान

24

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.18ऑगस्ट):-जि.प.प्रा.शा.गणगेवाडी ता.आष्टी या शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.डॉ.शरद मोहरकर,डॉ.दत्ता गणगे व डॉ.गणेश घाडगे,ग्रामपंचायत सदस्य कल्याण मोहरकर,तानाजी गणगे,सुभाष तात्या गणगे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमंत मोहरकर,सर्व सदस्य,पालक,विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक एकनाथ पालवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणाच्या प्रमुख कार्यक्रमानंतर जि.प.प्रा.शाळा गणगेवाडी शाळेतील इयत्ता आठवी एन.एम.एम.एस.परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी सोनाली संदीप जाधव,लक्ष्मण बाबासाहेब मोहरकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गणगेवाडी सारख्या दुर्गम,डोंगरातील लहानशा वाडीतून शिक्षण घेऊन पुढे एम.बी.बी.एस.एम.डी.असे उच्च शिक्षण घेऊन आष्टी येथे सुप्रसिद्ध असे मोहरकर हॉस्पिटल उभारून जनतेची सेवा करणारे डॉ.शरद मोहरकर,बीडसांगवी येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉ.दत्ता गणगे व रशियामध्ये सध्या एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत असलेले डाॅ.गणेश घाडगे तसेच इंजिनीरिंग चे शिक्षण घेत असलेले अविनाश गणगे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या व शाळेच्या वतीने करण्यात आला.डाॅ.शरद मोहरकर यांनी एन.एम.एम.एस.परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी यांना प्रत्येकी अकराशे एक्कावन रुपयांचे रोख पारितोषिक देऊन प्रोत्साहन दिले.

याप्रसंगी बोलताना डॉ.शरद मोहरकर यांनी शाळा हे एक ज्ञानमंदिर आहे व पालक व सर्व ग्रामस्थ हे या ज्ञानमंदिराचे पुजारी बनले पाहिजेत.पालकांनी गावातील शाळेच्या विकासाकडे लक्ष द्यावे व मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे काळजीपूर्वक पहावे असे सांगितले.आपल्या भाषणात त्यांनी ग्रामस्वच्छता,व्यसनमुक्ती,महिला सबलीकरण,संतुलित आहार,कोरोना पासून बचाव,बचतीचे महत्व या सर्व विषयावर सखोल मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी अपयशाला न घाबरता सतत अभ्यास केल्यास नक्कीच यश मिळते असे सांगितले.ग्रामस्थांनी शाळेच्या भौतिक सुविधा साठी लोकवर्गणीतून विकास कामे करावीत असे आवाहन केले तसेच शाळेच्या विकासकामांसाठी गणगे वाडीतील ग्रामस्थ जेवढा समाजाचा सहभाग म्हणून रक्कम जमा करतील तेवढीच रक्कम मी स्वतः शाळेसाठी देईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

यावेळी सर्व ग्रामस्थांनी व युवकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन शहादेव पिंपळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एकनाथ पालवे,शिक्षक शिवाजी पांढरे,शहादेव पिंपळे,चंद्रशेखर धुमाळ,श्रीम.शैला जाचक,श्रीम.अश्विनी टेकाडे,श्रीम.सुषमा धोंडे,विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.