चिमूर क्रांती भुमीत ओबीसी विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह द्या- कवडू लोहकरे

22

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.18ऑगस्ट):- संपुर्ण भारतात चिमुरची क्रांती अजरामर आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने चिमुरची जनता इंग्रजांच्या विरोधात पेटुन उठली.इंग्रजांना ‌ सळो की पळो करून सोडले. ज्या भुमीत रक्ताचा सडा पडला, इंग्रजांच्या विरोधात लढता -लढता ज्या क्रांतीकारकांनी आपले रक्त अर्पण केले अशा थोर क्रांतिकारकांना दरवर्षी 16 आगस्टला शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.

चिमुर क्रांती भुमीत एकही ओबीसीचे वसतिगृह नाही. अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीचे वसतिगृह आहेत पण ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एकही वसतिगृह नसल्याने विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे.

ओबीसी खात्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार चिमुर क्रा़ंती भुमीत शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले असता जिल्ह्याला दोन ओबीसी वसतिगृह देण्याची घोषणा केली. त्यात चिमुर क्रा़ंती भुमीला एक वसतिगृह देण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कवडू लोहकरे यांनी केली आहे.

बहुतांश ओबीसी विद्यार्थ्यांथी होतकरू व गरिब असल्याने पालक राहण्याचा व जेवणाचा खर्च करू शकत नाही. चिमुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालय ,ग्रामगिता महाविद्यालय, नेहरू विद्यालय, आठवले समाजकार्य महाविद्यालय, आय टि आय कालेज, सेंट क्लारेट स्कुल, बांगला कान्व्हेट असल्याने अनेक गरिब विद्यार्थी दुरवरून शिक्षण घेण्यासाठी येत असतात पण चिमूरात ओबीसी वसतिगृह नसल्याने ओबीसी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे अनेक ओबीसी मुले ,मुली शिक्षणापासून वंचित आहेत.ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चिमुरात एक वसतिगृह देण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कवडू लोहकरे यांनी ओबीसी खात्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे करण्यात आली आहे.