साहित्य क्षेत्रातील ऑनलाईन सर्वोच्च व्यासपीठ स्टोरीमिरर कडून अंगद दराडे यांना पुरस्कार

31

✒️बीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बीड(दि.19ऑगस्ट):-साहित्य क्षेत्रात स्टोरीमिरर हे व्यासपीठ नेहमी चर्चेत असतांना पाहिल्या जाते , मराठी साहित्यिकांसाठी स्पर्धा उपक्रम पुरस्कार संमेलन इत्यादी सेवेसाठी मराठी विभाग प्रमुख रोशन मस्के सरांच्या मार्गदर्शनाने इथे अनेक मराठी साहित्यिकांना संधी मिळल्या जातात,इतेकच नव्हे तर साहित्यिकांशी आपुलकीचे नाते जपतांनाही स्टोरीमिरर मराठी विभाग प्रमुख रोशन मस्के सर अनेक साहित्यिकांमध्ये लोकप्रिय असतांना दिसल्या जातात.स्टोरीमिरर हे संपूर्ण भारत देशातच नव्हे तर अंतराष्ट्रीय स्तरावर देखील इंग्रजी विभातुन त्यांच्या सेवा सुविधा मुळे चर्चेत राहिलेले आहे, अश्याच या साहित्य व्यासपीठाचा या आठवड्याचा सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून एकूण हजारो लेखकापैकी मोजक्याच लेखकांना निवड करून त्यापैकी उत्कृष्ट रचना म्हणून संपादकीय निवड व प्रेक्षकांच्या पसंती ची निवड असा एक पुरस्कार दोन गटात दिल्या जातो.

या वेळीचा ऑथर ऑफ द वीक प्रेक्षक पसंती म्हणून लेखकांच्या बहूमतावर अंगद दराडे यांना प्रदान केला आहे. त्यांनी सर्वांत जास्त मत घेऊन हा पुरस्कार जिकंला आहे.
या पुरस्कारा बद्दल बोलतांना अंगद दराडे त्यांच्या मनोगतात सांगतात, स्टोरीमिरर कडून मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी प्रथम पुरस्कार असून हा पुरस्कार मला स्टोरीमिरर विभाग प्रमुख रोशन मस्के सरांच्या मार्गदर्शनामुळे व साहित्यिकांच्या पाठीब्यांमुळे मिळला आहे, मी नवीन साहित्यिक असतांना एक दिवस मला मराठी विभाग प्रमुख मस्के सरांचा फोन आला व आजपर्यंत त्यांच मार्गदर्शन मिळाले, साहित्य क्षेत्रात स्टोरीमिरर हे खुप छान व्यासपीठ आहे, त्याहून छान मराठी विभाग प्रमुख थेट तळागाळातील साहित्यिकांशी संपर्क करून साहित्य सेवा करतात.

त्यामुळे माझ्या सारख्या सामान्य लेखकाला स्टोरीमिरर कडून सन्मान मिळाला,मी सर्व साहित्यिकांना नक्कीच आव्हान करेल की आपण ही स्टोरीमिरर व्यासपिठावर नक्कीच आपले साहित्य प्रकाशीत करा, ही सर्व सेवा स्टोरीमिरर अगदी मोफत व पारदृशी करते, रोशन सरांमुळे मला इथे साहित्य सेवा करण्याची सुद्धा संधी मिळालेली आहे.या पुरस्काराबद्दल मराठी विभाग प्रमुख रोशन मस्के सर व साहित्यिक विशाल पाटील वेरूळकर, नरेंद्र पाटील सर नंदूकुमार शेंदरे,शालू कृपाले,उषा घोडेस्वार,राजश्री मराठे, चंदन तरवडे, जया मुंडे, काशीकन्या वनश्री पाटील,रूपाली चौधरी इत्यादीनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या