ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग प्रवेशासाठी आव्हान

34

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

जळगांव जिल्हा ग्रंथालय संघ संचलित प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया …..
अटी
10 वी पास
वय 18 वर्ष पूर्ण दि.17/8/2021 वार बुधवार पासून सुरू करण्यात आली. असून दि. 26 /8 /2021 अखेर कार्यालयीन वेळेत गरजूंनी परिपूर्ण फार्म भरून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आव्हान जळगांव जिल्हा ग्रंथालय संघातर्फे करण्यात येत असून फार्म मिळण्याचे ठिकाण व जमा करण्याचे ठिकाण हे भवरलाल भाऊ जैन वाचनालय व ग्रंथालय धरणगाव जि.जळगांव, साने गुरुजी ग्रंथालय अमळनेर येथे राहील. सकाळी 10 ते 06 संध्या. या वेळेत सुरू राहील.सदर ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग हा महाराष्ट्र शासनाचा शासनमान्य वर्ग असून गरजूंनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगांव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष युवराज वाणी सर,उपाध्यक्ष पी एम पाटील सर,कार्यवाह संजय पाटील,सतीश पाटील सर,योगेश पी.पाटील यांनी केले आहे.सदर प्रशिक्षणाचा लाभ साधावा.

शाळा,कनिष्ठ महाविद्यालय,वरिष्ठ महाविद्यालय,कृषी महाविद्यालय,कृषी विद्यालय, अभियांत्रिकी विद्यालय,विविध महाविद्यालये इत्यादी ठिकाणी ग्रंथपाल,सहायक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर,निर्गम सहाय्यक, इत्यादी ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.सदर प्रमाणपत्र कोर्स हा तीन महिन्याचा असून या कोर्सचा सार्वजनिक वाचनालयात काम करणाऱ्या व समाजसेवा करणाऱ्या युवकांना देखील फायदा होईल.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगांव जिल्हा ग्रंथालय संघा तर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी योगेश पी.पाटील संजय पाटील,यांच्याशी संपर्क.9975430366,9595802955,9764096901.