रणमोचन फाट्यालगत असलेल्या नादुरुस्त रोड तातडीने दुरुस्त करा

22

🔹पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या पीडब्ल्यूडी इंजिनीयरला सूचना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.19ऑगस्ट):-ब्रह्मपुरी – आरमोरी महामार्गावरील रणमोचन ते जुगनाळा फाट्या जवळील जवळपास ३०० ते ४०० मीटर एक पदरी रोड मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात निकामी झाला आहे त्यामुळे सदर महामार्गावरून केवळ एकाच बाजूने वाहतूक सुरू असून सदर ठिकाणी बरेचसे अपघात घडले आहेत यात बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागला असून ५ ते ६ व्यक्तींना अपंगत्व आलेले आहे गेल्या दोन दिवसापूर्वी दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला असून एकाला अपंगत्व आले आहे ह्याच बाबीचा विचार करीत.

संभाव्य धोका लक्षात घेता ब्रह्मपुरी आरमोरी महामार्गाची त्वरित दुरुस्तीची नितांत गरज भासत आहे यापुढे कोणत्या व्यक्तीची जीवित हानी होणार नाही त्यामुळे आपण याचा विचार करून आठ ते दहा दिवसात सदर रोड चे काम पूर्ण करावे अशा सूचना पीडब्ल्यूडी च्या इंजिनीयर यांना ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी प्रत्यक्षदर्शी घटनास्थळावर वस्तुस्थितीची स्वतः पाहणी करण्यास भाग पाडले यावेळी गुरुवे मॅडम इंजिनिअर नॅशनल हायवे आवळे साहेब शाखा अभियंता दिलीप कुमार वाघ साहेब व्यवस्थापक मे अजवानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मस्के साहेब उपव्यवस्थापक यांची उपस्थिती होती त्यांनी लवकर तातडीने शक्य तितक्या लवकर काम चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले .

इथले अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन संबंधित कंपनीने तातडीने रोडचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे शिवाय ही पीडब्ल्यूडी विभागाची नैतिक जबाबदारी पण आहे अशा प्रकारची पुन्हा अशी कोणती घटना उद्भभवली तर सबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार आहे –
रोशन यादव
पोलीस इन्स्पेक्टर पोलीस ठाणे ब्रह्मपुरी.