सिरसाळा पोलिसांनी चोरीच्या गुन्हयातील फरार असलेल्या दोन आरोपीस केले जेरबंद

38

✒️सिरसाळा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिरसाळा(दि.20ऑगस्ट):- पोहनेर से डिग्रस जाणारे रोडवर चाकुचा धाक दावुन चाकुने जखमी करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीकडुन एक मोटारसायकल, एक ग्रॅम सोन्याचा ओम, आणि नगदी ५०००/- रुपये अशा मुद्देमालासह एकुण ४४८००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई सिरसाळा पोलिसांनी केली आहे.

सिरसाळा पोलिंसाकडून आज गुरूवार दि.19 आँगस्ट रोजी दिलेली माहिती अशी की, दि. ०३/०८/२०२१ रोजी रात्री ०९.३० वा. सुमारास फिर्यादी नामे बाळकृष्ण कारभारी खरात रा. डाकुपिंप्री ता. पाथरी जि. परभणी हे त्यांचे मो.सा. क्रमांक एम. एच. २२ ए.यु. ७२३९ हिचावरुन डिग्रस ते पोहनेर जाणान्या रोडवरील लहान चारीजवळ पोहचले असतांना त्यांचे मोटारसायकलचे पाठीमागुन एक मोटारसायकलवर दोघेजन तोंड बाधलेल्या इसमांनी त्यांची गाडी आडवून त्यांना चाकुचा धाक दाखवून त्या चाकुने त्याचे उजव्या दंडावर चाफु मारुन जखमी करून त्याचे खिशातील ५०००/- रुपयाचा मोबाईल आणि ७००० रुपये नगदी रोख रक्कम व गळयातील एक प्रेम सोन्याचा ओम कि.अ. ४८००/ रुपये बळजबरीने चोरुन घेवून गेले यावरुन पोलीस ठाणे सिरसाळा गु.र.न. १४३ / २०२१ कलम ३९४,५०६ भा.दं.वी. प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास पोउपनि एम.जे. विघ्ने हे करीत आहेत.

सदर गुन्हयाचे तपासादरम्यान गुन्हयातील आरोपोताचा घेतला असता गुप्त बातमीदार मार्फत माहीती मिळली को आरोपी १) नवल्या ऊर्फ इरफान वियन सय्यद वय २२ वर्ष, २) लक्ष्मण किसन सातपुते वय २३ वर्ष, दोन्ही रा. सिरसाळा ता. परळी वे. हे दिनांक ०३/०८/२०२१ रोजी एका मोटारसायकलवर रात्रीच्यावेळी डिग्रस भागात फिरत होते. यावरून वर नमुद आरोपीतांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. यावरून सदर आरोपीतांना गुन्हयात अटक करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेवुन गुन्हयासंवधाने चौकशी केली असता त्यातील आरोपी नामे नवल्या ऊर्फ इरफान बिवन सय्यद रा. सिरसाळा ता. परळी यांने निवेदन पंचनाम्याव्दारे गुन्हयात वापरलेली मोटारसायकल क्रमांक एम. एच.११. पी. ९६९८ व गुन्हयात वापरलेला एक चाकू काढून दिल्याने गुन्हयाचे तपासकामो जप्त करण्यात आले. तसेच आरोपी क्रमांक २ लक्ष्मण किसन सातपुते रा. सिरसाळा ता. परळी यांने दिनांक १९/०८/२०२१ रोजी पोलीस कोठडी रिमांड मध्ये असतांना निवेदन दिलेवरुन त्याचे राहते घरातुन एक ग्रॅम सोन्याचा ओम आणि नगदी ५०० रुपये दराच्या १० नोटा असे एकुण ५०००/- रुपये मेमोरंडम पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आले आहे.

यातील आरोपींतानी जिल्हयात व इतर जिल्हयात केलेले अशा प्रकारचे गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे.ही कामगिरी आर. राजा. पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती स्वाती भोर अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये उपविभाग अंबाजोगाई, सहा, पोलीस निरीक्षक पी.वी. एकशिंगे पोलीस ठाणे सिरसाळा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि एम.जे. विघ्ने, पोना १७५३ अंकुश मेंढके, पोना १८६६ जेटेवाड, पोशि १८१६ सय्यद, पोशि १८८५ पटाईत यांनी केली आहे. या कारवाईमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.