सर फाउंडेशन जळगाव आयोजित डान्स स्पर्धेचे बक्षीस व नारीशक्ती पुरस्कार वितरण

21

✒️जळगाव प्रतिनिधी(निलेश पाटील)

जळगांव(दि.20ऑगस्ट): – सर फाऊंडेशन जळगांव आयोजित देशभक्तीपर समुह नृत्य स्पर्धेचा बक्षीस वितरण व जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा किड्स गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ डी एम देवांग शिक्षणाधिकारी निरंतर जळगाव, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून म्हणून विजय पवार शिक्षण विस्तार अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी, जळगांव राजकीरण चव्हाण, सर फाऊंडेशन सोलापूर जिल्हा समन्वयक व सदर कार्यक्रमाचे प्रायोजकत्व मा. प्रविण आत्माराम पाटील केंद्रप्रमुख पाचोरा (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगांव) यांनी केले. सरांनी सर्व विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रे स्वखर्चाने उपलब्ध करून दिले होते हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.

सर्वप्रथम ईशस्तवन व स्वागतगीत जयश्री काळवीट मॅडम यांनी सादर केले. अध्यक्ष व प्रमुख अतिथी आणि जिल्हा समन्वयक यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व नटराज पूजन करण्यात आले.कार्यक्रमासाठी उपस्थित अध्यक्ष व सर्व मान्यवरांचा पुस्तक व बुके देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक सुनिता पाटील मॅडम, महिला जिल्हा समन्वयक जळगाव यांनी केले. जिल्हा समन्वयक निलेश शेळके सर यांनी सर फाऊंडेशन च्या कार्याची माहिती सर्वांना दिली.जिल्हास्तरीय घेण्यात आलेल्या ऑनलाईन देशभक्तीपर समूहनृत्य स्पर्धेतील प्राथमिक ,माध्यमिक व शिक्षक गटातील विजेत्या स्पर्धक व शाळांना बक्षीस देण्यात आले.

प्राथमिक गट-प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद केंद्रशाळा गोंडगाव ता भडगाव जि जळगाव ,द्वितीय क्रमांक- जि. प.शाळा कोथळी ता मुक्ताईनगर जि जळगाव,तृतीय क्रमांक-(विभागून देण्यात आला आहे) जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलीची शाळा लोहारा ता पाचोरा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादरपूर ता पारोळा, उतेजनार्थ १-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारखेडा ता पाचोरा जि जळगाव,उतेजनार्थ २- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपुरे ता पाचोरा .माध्यमिक गटप्रथम क्रमांक-माध्यमिक विद्यालय कुऱ्हाड ता पाचोरा जि जळगाव,दुसरा क्रमांक- भरत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय न्हावी ता यावल,तृतीय क्रमांक- डॉ जे जे पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा ता पाचोरा ,उतेजनार्थ -१ आण्णासो एस.आर पाटील माध्यमिक विद्यालय मामलदे.तालुका चोपडा जि.जळगाव व उतेजनार्थ- २जिल्हा उच्च प्राथमिक शाळा गोराडखेडा ता पाचोरा शिक्षक गट प्राथमिक व माध्यमिक-प्रथम क्रमांक-पंचायत समिती पाचोरा शिक्षिका गट,द्वितीय क्रमांक-सौ.कामिनी पंकज चव्हाणजिल्हा परिषद मुलांची शाळा आव्हाने ता जळगाव ,तृतीय क्रमांक-ज्योती वानखेडे मॅडम जी.प.शाळा ओझर खेडे तालुका भुसावळ जि जळगाव,उतेजनार्थ -१. श्रीमती क्षमा साळी.आणि टीम एरंडोल शिक्षिका.व उतेजणार्थ- 2 श्रीमती वर्षा वाल्मिक पाटील आणि टीम..जि प उच्च प्राथमिक शाळा गरताड ता.चोपडा जि.जळगाव.
सर फाउंडेशन महाराष्ट्र यांचे कडून दिला जाणारा 8 मार्च महिला दिनानिमित्त नारीशक्ती पुरस्कार राज्य समन्वयक श्री सिद्धाराम माशाळे, श्री बाळासाहेब वाघ व सौ हेमा ताई वाघ यांनी दिलेला होता.त्या पुरस्कार प्राप्त जळगाव जिल्ह्यातील महिला शिक्षिका सुनीता पाटील ,अरुणा उदावंत,सोनाली साळुंखे,जयश्री काळवीट, स्वाती बळगुजर,मनीषा सूर्यवंशी, सीमा पाटील,मीरा जंगले,मंगला म्हत्रे, व उज्वला महाजन या कर्तबगार महिलाना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

श्री राजकिरण चव्हाण सर (जिल्हा समन्वयक सोलापूर) यांनी कार्यक्रमाच्या आयोजन , नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सर फाऊंडेशनच्या भारतभरातील विस्ताराची, शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याची यशोगाथा सांगताना जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांकडूनही भरीव कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रायोजक प्रविण आत्माराम पाटील सर यांनी कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यातही सर फाऊंडेशनच्या प्रत्येक विधायक कार्यात शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
उपशिक्षणाधिकारी विजय पवार साहेब यांनी सर फाऊंडेशन करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली व भविष्यात कोणतीही मदत लागल्यास ती नक्की करू असे आश्वासन दिले. शिक्षकांनी आपले काम निष्ठेने केल्यास त्यांना नक्कीच शाबासकीची थाप मिळते असे त्यांनी सांगितले अध्यक्षीय भाषणात आदरणीय डॉ. देवांग साहेब यांनी सर्व यशस्वी स्पर्धकांचे, सुंदर नृत्य करणाऱ्या शिक्षिका भगिनींचे कौतुक केले. आदरणीय साहेबांनी निवृत्तीनंतरही सर फाऊंडेशनच्या कार्याला पूर्णवेळ देणार असल्याचे सांगितले. नारीशक्ती पुरस्कार मिळालेल्या सर्व भगिनींचे अभिनंदन केले.

यानंतर आदरणीय अरुणा उदावंत मॅडम (जिल्हा समन्वयक जळगाव) यांनी कार्यक्रमाला मोलाचे सहाय्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचे आभार मानले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रविण पाटील सर व सौ. जयश्री काळवीट मॅडम यांनी केले.चविष्ट अल्पोपहारानंतर आदरणीय श्री राजकिरण चव्हाण सर (सोलापूर जिल्हा समन्वयक) यांनी सर्व तालुका समन्वयक यांच्याशी संवाद साधून पुढील ध्येय धोरणे निश्चित केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास पाटील, विलास निकम , उज्वला महाजन, अनिल वराडे, सुनील दाभाडे , मनीषा सूर्यवंशी, जगदीश बियाणी, भूषण महाले, छाया इसे, मंगल म्हेत्रे, अनिल माळी, सोनाली साळुंखे, अमित डूडवे, क्षमा साळी, कल्पना चौधरी, सुनील बडगुजर ,स्वाती बडगुजर, विजय पाटील, वंदना नेहेते ,निलेश धर्मराज पाटील, जयश्री काळवीट, समाधान जाधव जगदीश पाटील, मीरा पाटील -जंगले, प्रवीण पाटील ,सीमा पाटील, प्रेमचंद अहिरराव, ध्रुवास राठोड, मनीषा पाटील,भाईदास सोमवंशी इ तालुका समन्वयकांनी परिश्रम घेतले.