स्व. राजीव गांधींचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी : यश दत्तात्रय

23

🔹एनएसयुआय तर्फे जयंतीचे फळ वाटप व रक्तदान शिबीर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.20ऑगस्ट):-संगणक क्रांतीचे जनक व आधुनिक भारताचे शिल्पकार स्व. राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा ते अवघ्या चाळीस वर्षांचे होते. त्यावेळी राजीव गांधी यांनी ‘डिजिटल इंडिया’चा नारा दिला, त्यामुळे आज आपल्याला प्रगतशील देश दिसून येत आहे.

त्यांचे विचार युवकांनी अंगिकाराची गरज असल्याचे विध्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांनी म्हटले. ते पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात तसेच काँग्रेस विदयार्थी प्रदेश अध्यक्ष अमीर शेख ,विदर्भ प्रभारी अभिनय मार्का यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्य शासकीय महाविद्यायल येथे फळ वाटप व रक्तदान शिबीर कार्यक्रम एनएसयूआय तर्फे घेण्यात आला यामध्ये ५० युवकांनी रक्तदान केले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेसचे जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, काँग्रेसचे युवा नेते कुणाल चहारे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, मंगेश डांगे, राज यादव, पप्पू सिद्धीकी, कृष्णा रेड्डी, मंथन वासाडे, अंबर हकीम, चेतन कन्नमवार, अंकुश पिपरोडे, शंतनू सातपुते, राहुल चौधरी, राजू वासेकर यांची उपस्थिती होती.

यश दत्तात्रय पुढे बोलनानं म्हणाले कि, स्व. राजीव गांधी यांच्या विचारातून कॉंग्रेसने पुढे जागतिकीकरण आणि आधुनिकीकरणाला वाट करून दिली. मतदाराचे वय २१ वर्षांहून १८ वर्षांवर आणले तेही राजीव गांधींनी.कारण, त्यांचा नव्या पिढीच्या समंजसपणावर भरवसा होता.
या नव्या भारताचे जन्मदाते राजीव गांधी. ते अकाली गेले नसते, तर भारताचे भवितव्य आणखी वेगळ्या शैलीत लिहिले गेले असते. असे देखील ते म्हणाले.