देगलूर येथील बौद्ध समाज स्मशानभूमीत वृक्षारोपण

33

✒️तालूका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.२1ऑगस्ट):- देगलूर शहरातील लेंडी नदीच्या किनाऱ्यावर होत असलेल्या बौद्ध समाजाची स्मशानभूमी ही स्मशानभूमी न दिसता पार्क व पर्यटनक्षेत्र दिसले पाहिजे व येथील वातावरण हे नयनरम्य व शांतीपूर्ण होण्यासाठी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार यांच्या संकल्पनेतून मुख्याधिकारी इरलोड साहेब, नगरसेवक सुशिलकुमार देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर नगर परिषदेच्या वतीने याठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात येत आहेत काही झाडे लावणे झाले असून काम पूर्ण झाल्यावर अजून मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात येणार आहेत.

या स्मशानभुमीच्या कामाकडे जातीने लक्ष देत या कामाला पुर्नत्वास आणण्याचे काम देगलूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार व नगरसेवक सुशिलकुमार देगलूरकर यांनी केले.यावेळी गुत्तेदार देविदासजी वानखेडे, नगर परिषद कर्मचारी फरसे, अग्निशमनचे पशामवार, गफारभाई, अरुण आऊलवार, यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.