सडोली खा येथे सुपर आर्मी मार्फत अनोखे रक्षाबंधन

28

🔹काका आमच्या हाती खाऊ द्या, तंबाखु नको

✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.22ऑगस्ट):-सडोली खा येथील संत गोरा कुंभार तरुण मंडळ गेली 13 वर्षे विविध तंबाखू विरोधी उपक्रम राबवत आहे. या वर्षी संत गोरा कुंभार तरुण मंडळ व सलाम मुंबई फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सलग 13 व्या वर्षी दुकानदारांना सुपर आर्मी या चिमूकल्यांच्या प्रबोधन गटामार्फत राख्या बांधण्यात आल्या. राख्या बांधून, दुकानदार काका आमच्या हाती खाऊ दया, तंबाखू नको असे भावनिक आवाहन करण्यात आले. दुकांदारांनीही 14 वर्षे वयाच्या आतील मुलांना तंबाखू जन्य पदार्थांची विक्री करणार नाही असे वचन सुपर आर्मीला दिले.

यावेळी कार्यक्रमाचे संयोजक व म. गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त अद्यापक एकनाथ कुंभार यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्त जीवनाची शपथ दिली.यावेळी मुलांच्या हाती तंबाखू चे दूषपरिणाम दाखवणारी चित्रे व घोषवाक्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी तंबाखू मतलब खल्लास, अरे अरे भावा खाऊ नको मावा, धूम्रपान जानलेवा है,तंबाखू गुटखा खातो कशाला-कॅन्सर होईल तुझ्या घशाला, No smoking, Tobacco Kills अशा घोषणा मुलांनी देऊन परिसर दणाणून सोडला.सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी एकनाथ कुंभार, सदाशिव बेलेकर, रामचंद्र मगदूम, कृष्णात बेलेकर, रमेश कुंभार, संजय कुंभार, सिद्धेश कुंभार, आनंदा पाटील, राजेंद्र पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.