श्रावणमासातील अद्धभूत सौंदर्य

28

पावसाच्या हळूवार सरीचे आगमन झाले होते.सारी धरती पावसाच्या पहिल्या थेंबासाठी आसूरलेली होती.ढेकलातील एकमयतेला विरवून जमीनीत माती कणाकणात सामावली होती.नवा बदल घडवण्याची खरी ताकत श्रावणमासात असते. मानवाच्या जीवनाला गतिमान व सृजनत्व आणण्याचे काम निसर्गातील श्रावण करतो.

आभाळात काळे काळे मेघ जमा होतात.ढगांची मैफिल आकाशात भरते.कृषीवल आपल्या उन्नतीचे स्वप्न सुंदर फुलवतो.काळ्या मेघाचा अंदाज घेत लांडोर आंब्याच्या वनात थुईथुई फिसारा फुलवतो.सारा निसर्ग नटलेला असतो.आल्हादायक गंधवाह मनाला उभारी देतो.लहान पोरंटोरं पावसाच्या पाण्यात कागदी नाव,बांध घालने,शिंपले वेचणे,अंगावर पाणी झेलणे .मासे पकडणे असे विविध खेळ खेळतात.शाळेची आठवण विसरून तासनतास रानांत धुडाळत असतात.रानमेव्याची मेजवाणी घेत असतात.रानभाज्याची रेलचेल पाहायला मिळते.काटवेलाचे वेल तनावाला गुफूंन आपले बहरणे मौजेत करते.पावसाचे पाणी साठलेल्या डबक्यातील बेडूक दिवसरात्र डरावँ डरावॅ करत असतो.

श्रावणमासातील रिमझीम मनाला नवा आनंद देते.पाखरांची किलबिलाट,पानाची सळसळ,फुलांचा गंधकोष , शेतकऱ्यांची लगबग,माश्यांचे गुंजारव,गुरांचे खिदळणे.मनुष्यास नवा आविष्कार घडवते.पावसाची रिपरिप ,तुषारांची कारंजी मनातील संवेदशील निसर्गाशी दोस्ती करते.ढगांचा गडगड,विजांची चमचम,पानाची सळसळ,डोळ्याचे पारने फेडते,.कमानीच्या डोंगरदऱ्यातून वाहणारा झरा , धबधबा नव्या परिवर्तनाचे गीत गाते.निसर्ग मानवाचा मित्र आहे.निसर्गाच्या कुशित शिरून आपले अस्तित्व तयार करतो.निसर्ग मानवाला नवे तत्वज्ञान शिकवतो.बदलण्याचे सारे संदर्भच देण्याचे काम निसर्ग करतो.

निसर्गातील श्रावणमास हा नव्या पर्वणीची कौस्तुभी असते.वाऱ्याचे कारंजेतुषार मनाला मोहीत करतात.नवमीलनाची आस लावतात.साऱ्या सृष्टीला सौंदर्याचे लेणे लावतात.

माणूस निसर्गातील अमुल्यरत्न आहे.पण हाच माणूस निसर्गाला उद्धवस्त करत आहे. मानव निसर्गाला वश करण्याच्या वक्रदृष्टीने निसर्गाचा समतोल बिघडला आहे .याला सर्वस्वी माणूस जबाबदार आहे.आतातरी माणसाने आपली नीती बदलवली नाही तर श्रावणमासातील निसर्गातील आनंद तो घेऊ शकणार नाही.श्रावणमास माणसाला नवे मूल्यमंथन करायला लावतो.मनशोक्त भिजायला लावतो.नव्या पादपाला नवी उभारी देतो.काळ्या आईच्या कुशीतं नवंअंकुर फुलवतो.राजा आणि रंक,गरीब व श्रीमंत असा भेद पाऊस करीत नाही.पावसाळ्यातील रानवाटा चिखलमय होतात. शेतकरी आपल्या वावरात नव पीकांची पेरणी करतो.राघुमैनाचे थवे पीकांवर निवांत घुमत असतात.मधमाश्याचे पोळ सहजीवनाचे नवे नाते घट्ट करते.रंगीबेरंगी फुलाचे ताटवे बहरून येतात.सारं रानं हिरव्याकंच रंगानी मोहरून येते.जंगलातील कासार पाण्यानं भरून जातो .वन्यजीव मौजमस्तीत तल्लीन असतात.

श्रावणमासातील आनंद घेणारा माणूस स्वतःच्या हाताने स्वतःचे आयुष्य बरबाद करत आहे. वृक्षवल्लीचे शोषण करत आहे.प्राण्याची कत्तल करत आहे.आज श्रावणातील जलचक्र पुर्णपणे बिघडले आहे.काही भागात पाणी टंचाई तर काही भागात पुरांचा तडाका पाहायला मिळत आहे . आतातरी माणसाने निसर्गाशी दोस्ती करावी.पाखरांची शाळा भरवावी.प्राण्याचे संरक्षण करावे.नभातील पडणाऱ्या जलधारा अंगावर घ्याव्या.मनशोक्त भिजावं,मनशोक्त हिंडावं,श्रावणातील तुषारांची कारंजीने मेंदू स्वच्छ करावा.नव्या मिलनाची नवी संहिता तयार करावी.श्रावणातील थेंब थेंब अंगावर झेलून निसर्गाचे गीत गावे.नव्या सृजनत्वाचे नवे बीजं रूजवावे. श्रावणमासातील अद्धभूत सौंदर्याच्या विलोभमय सप्तरंगाचे रहस्य शोधावे.नवा ध्यास नवे बदल घडवावे.निसर्गाच्या कुशीतं शिरून श्रावणाची मौज घ्यावी.

नभ शिखरावरून धारा बरसल्या
श्रावनजलाने झेलून घेतल्या
धरतीला जणू सुगंध सुटला
नवसृजनत्वाचा नवा अंकुर फुटला…….

✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००