केंद्र सरकारची ई- श्रम कार्ड योजना- सलुन आणि ब्युटी पार्लर करागीरालाही लाभ मिळणार..

45

🔹शासनाच्या विविध आर्थिक,शैक्षणिक योजनांचा लाभ मिळणार

✒️ठाणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

ठाणे(दि.31ऑगस्ट):-आपल्या देशात विविध क्षेत्रात जवळ जवळ ३८ कोटी असंघटीत कामगार आहेत, देशाच्या प्रगतीत आणि विकासात या कामगारांनी आजवर लाखमोलाचे योगदान दिलेले आहे परंतु असंघटीत पणामुळे या कामगारांना नेहमीच दुर्लक्षित करण्यात आलेले आहे. परिणामी हे सर्व कामगार सर्व शासकीय सवलती आणि सुरक्षापासून वंचित आहेत.केंद्र सरकारने नाभिक समाजातील सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायाचा देखील असंघटीत कामगार म्हणून समावेश केल्याने व्यवसायिकांना स्वतःची ओळख सिद्ध करण्याची एक नामी सुवर्ण संधी मिळाली आहे.

म्हणूनच सर्व सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायिकांनी, कारागिरांनी आपल्या स्वतःच्या नावाची नोंद करून ई-श्रम कार्ड काढून घ्यावे आहे असे आवाहन ज्येष्ठ समाज सेवक आणि राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री संजय पंडित यांनी केले आहे.केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री श्री.भूपेंद्र यादव यांनी दि.२६ ऑगस्ट रोजी या महत्वाकांक्षी ई-श्रम कार्ड योजनेचे एका पोर्टल द्वारे उद्घाटन करून नवी दिल्ली येथे शुभारंभ केला आहे.या योजनेद्वारे देशातील सर्व असंघटीत कामगारांचा एक राष्ट्रीय डेटा बेस तयार केला जात असून एकाच पोर्टलवर सर्वांची नोंद करून “एक कामगार-एक कार्ड” या प्रकारे सर्व असंघटीत कामगारांना एक नवी हक्काची ओळख मिळणार आहे.

नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि मोफत असल्याने समाज बांधवांनी थोडीशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सदर योजनेत आपले आधार कार्ड आणि बँक खाते नंबर आवश्यक असल्याने इतर कुणाकडून नाव नोंदणी करून घेताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.सर्व सलून व ब्युटी पार्लर व्यवसायिकांनी आणि कारागिरांनी हे कार्ड सरकारच्या *http://www.eshram.gov.in* या अधिकृत वेब साईट वर जाऊन काढावे अथवा आपल्या विभागातील समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने काढून घ्यावे.नाव नोंदणी यशस्वीरीत्या झाल्यावर प्रत्येक कामगाराला एक यूएएन कार्ड मिळेलज्यावर बारा अंकी युनिक नंबर असेल,

हा नंबर म्हणजेच त्या कामगाराची ओळख असेल,
या योजनेद्वारे सरकार विविध सवलती देणार असून, दोन लाखा पर्यंतचे अपघाती विमा संरक्षण देखील देण्यात आले आहे.भविष्यात कार्ड धारकास शासनाच्या विविध आर्थिक,
शैक्षणिक योजनांचा लाभ मिळणार असून या पोर्टल द्वारे देशातील सर्व असंघटीत कामगारांचा एक डेटा बेस तयार होणार असल्यामुळे सरकारलाही विविध योजना आखताना याची खूप मोठी मदत होणार आहे,अशी माहिती श्री संजय पंडित यांनी दिली आहे,