नगर परिषद च्या जागेवर अतिक्रमण करून दुकान गाळे बांधकाम सुरू

28

🔹दोषी व्यक्तीवर कारवाई करा नगरपरिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी च्या नावे अशोक गिरेपुजे याचे पत्र

✒️गोंदिया,विभागीय प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गोंदिया(दि.31ऑगस्ट):- जिल्ह्यातील गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या गोरेगाव येथील दुर्गा चौक जगत कॉलेज रोड वर सध्या आहे एका व्यक्ती ने दुकान गाळे बनवण्याचे काम सुरू केले व ते सद्या काम पूर्ण होण्याच्या दिशेत आहे. म्हणुन काम सुरू होताच अशोक गिरेपुंजे यांनी याची तक्रार अर्ज नगर परिषद गोरेगाव येथील मुख्यअधिकारी यांना केले होते व त्या अनुषंगाने त्यांनी त्या व्यक्तीला बांधकाम बंद करण्याचे आदेश सुद्धा दिले होते पण त्याकडे दुर्लक्ष करत कायद्याची पायमल्ली करत त्या व्यक्तीचे बांधकाम सुरूच ठेवले असल्या मुळे अशोक गिरेपुंजे यांनी पुन्हा एकदा नगरपरिषद गोरेगाव च्या मुख्यअधिकारी यांना तक्रार अर्ज सादर केले आहे.

की विना परवानगीने शासकीय जागेवर दुकान कडे बांधकाम सुरू त्या बांधकामाला थांबवण्याबाबत तक्रार अर्ज सुद्धा देण्यात आला होता व नगरपरिषद ने त्या व्यक्तीच्या नावे काम थांबविण्याकरिता करिता आदेश सुद्धा काढला पण काम अजून सुरूच आहे. व त्याचप्रमाणे सेवा सहकारी चे अध्यक्ष सचिव यांनीही असेच प्रकरण केल्याचे निदर्शनात आले रस्त्याच्या जाग्यावर अतिक्रमण करून अधिकचा ताबा मिळवण्याचा स्पष्ट दिसत आहे तरी अध्यक्ष व सचिव सेवा सहकारी संस्था हे आपली दिशाभूल करत आहेत.

तसेच अनेक लोकांपासून लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहार करून या अवैध निर्माण दुकान गाळे लोकांना हस्तांतरित करण्याच्या तयारीत आहेत तरी जर समोर ही वादाची जागा बनली तर सर्वस्वी आपण जबाबदार असाल असे अशोक गिरेपूजे यांनी नगरपंचायत च्या मुख्यअधिकारी यांच्या नावे तक्रार अर्ज सादर केली आहे तरी बघायचे आहे की नगरपंचायत चे मुख्य अधिकारी यावर काय कारवाही करणार व अवैधरित्या चालत असलेल्या दुकान गाडीचे काम थांबवतात की नाही. या सर्व प्रकारच्या बाबीकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.