अंधशद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता बेंठक संपन्न

23

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.3सप्टेंबर):-अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आनंद विहार परळी रोड येथे कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष मा. विलासराव जंगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्ता बैठकीत नवीन शाखा कार्यकारणी,नवीन कार्यकर्त्यांना शिबिर,व अंधश्रद्धा या विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.

कोरोना महामारी च्या काळात सुरक्षित अंतर ठेवीत नवीन कार्यकारिणी निवडीसाठी नियोजित बैठक दि. सात सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मंगळवारी आनंद विहार या ठिकाणी केली आहे यावेळी ड्रा. विलास जोशी, आर. टी.लटपटे योगेश फड,राहुल साबणे,राजेश समुद्रे, विष्णू मुंडे यांची उपस्थिती होती.