पूरग्रस्त भागातील महाड येथे मदतीचे सेवाकार्य अखंड सुरूच

27

🔸आ.सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने चार पिकअप भरून संसार उपयोगी वस्तुची मदत

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.3सप्टेंबर):-गेल्या महिन्यात कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचे लातूर, बीड, उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्या आदेशावरून आ.सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने हाती घेतलेले मदतीचे सेवाकार्य अखंड सुरूच आहे.पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आ.धस मित्र मंडळाच्या वतीने चार पिकअप भरून जीवनावश्यक वस्तू कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड शहरासह व आजूबाजूच्या गावांमध्ये मदत करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात कोकणात झालेल्या मुसळधार पावसाने उद्भवलेल्या परिस्थितीत नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून संसार उघड्यावर आले होते.

संसार उपयोगी वस्तू पाण्यात बुडून गेल्या.नागरिक हतबल झाले होते.यावेळी राज्यभरातून मदतीचा ओघ कोकणात सुरू झाला होता अशा वेळेस रायगड जिल्ह्यातील आ.सुरेश धस मित्र मंडळाचे सर्व युवक पहिल्या दिवसापासून मदत कार्यात उतरले होते,रायगड जिल्ह्यातील महाड येथे मागील महिन्यात झालेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.हजारो नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने घरातील सर्व साहित्य,धान्य,मौल्यवान वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असल्याने या आपत्तीच्या काळात तात्काळ आ.सुरेश धस यांच्या आदेशाने रायगडमधील आ.सुरेश धस मित्र मंडळ मदतीसाठी दाखल झाले होते व तेथील स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य सुरू केले.

पहिल्या दोन दिवस मित्र मंडळाने चिखल काढण्याचे काम श्रमदानातून सुरू केले त्यानंतर तहसीलदार महाड यांच्याकडून ज्या गावांमध्ये पुराचा मोठा फटका बसला अशा ठिकाणची यादी घेऊन व कर्मचारी यांना सोबत त्या गावात अन्नधान्य,बिसलेरीचे पाणी,गोळ्या औषधे,कपडे,संसार उपयोगी साहित्य,जिवन आवश्यक वस्तू असे चार पिकअप भरून शक्य होईल तेवढी मदत केली.ही मदत करण्यासाठी आ.सुरेश धस मित्र मंडळचे अध्यक्ष अंकुश भगत,उपाध्यक्ष बाबासाहेब मोराळे आदी शेकडो युवकांनी मदत कार्यात सहभाग घेतला होता.यापुढेही आ.धस मित्र मंडळाच्या वतीने मदत केली जाणार असल्याचे युवकांनी सांगितले.महाड पूरग्रस्त भागातील नागरिकांनी आ.सुरेश धस मित्र मंडळाने मदत केली असल्याने आ.सुरेश धस यांना पत्र पाठवून आभार मानले आहेत.