ग्रामपंचायत पिंप्री यांचा आदर्श उपक्रम – स्मशानभूमी परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षरोपण

31

🔹निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

पिंप्री(धरणगांव)(दि.3सप्टेंबर):-निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं… आज हाच माणूस आपल्या उपकारकर्त्यावर उलटला आहे.

मनमोही पावसाने निसर्गासारखेच माझ्या अंतर्मनाला मोहविले आहे. झिमझिमणार्‍या पावसात सृष्टीचे सुजलाम् सुफलाम् रूप न्याहाळताना नकळत तुकाराम महाराजांचे भावमधुर काव्य आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सुरेल स्वरांचा साज लाभलेले कर्णमधुर गीताने कान टवकारले –

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |
पक्षीही सुस्वरे आळवीती ॥

वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान. संथपणे एका लयीत बरसणार्‍या पावसाच्या सरींनी बहरलेल्या सृजनशील निसर्गाच्या सान्निध्यात सृष्टीचा दृक्‌श्राव्य अनुभव घेता यावा, यासारखे भाग्य ते कोणते? मनातील आठवणींची पिसे भिरभिरू लागली.धरणीमातेने मुक्त हस्ते बहाल केलेला मौल्यवान खजिना म्हणजे वृक्ष आणि वेली. ‘परोपकाराय फलन्ति वृक्षाः’ या शब्दात वृक्षांचा गौरव केलेला आहे. निसर्ग आणि मानव यांच्यातील स्नेहसंबंध फार पुरातन कालापासून आहे. अगदी अनादी कालापासून निसर्ग मानवाचा मित्र आहे. वृक्ष ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.अलीकडे पर्यावरण प्रदूषणाविषयी बरेच काही वर्तमानपत्रातून वाचायला मिळते. प्रदूषणाचे दुष्परिणाम आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याच पृथ्वीचा, मानवाने सुरू केलेल्या जंगलतोडीमुळे पृथ्वीचा समतोल बिघडत चाललेला आहे.

कोविड काळात जनसामान्यांना तसेच प्रत्येक नागरिकांना विकत चा ऑक्सिजन घेऊन सुद्धा मिळाला नाही . कोरोना ने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे आपण जागृत असावे या भावनेने ग्रामपंचायत पिंप्री खु ता धरणगाव यांनी स्मशान भूमी परिसरात वृक्षारोपण केले.

या वेळेस पिंप्री खुर्द च्या सरपंच सौ. सरलाबाई ज्ञानेश्वर बडगुजर तसेच श्री.मंगल नामदेव पाटील (उपसरपंच) ग्रामविकास अधिकारी व सर्व सन्मानिय सदस्य , गावातील नागरिक ,श्री ईश्वर पितांबर धोबी श्री अशोक चौधरी सर ,ह भ प श्री देविदास पवार (देवा महाराज) ,श्री मनोज शर्मा ,श्री मोहन शिंदे, श्री मनोज मालू ,श्री देविदास चौधरी, श्री शंकर पवार ,श्री रामचंद्र लोखंडे ,श्री हेमराज बडगुजर (धोंडू मामा), सिराज कुरेशी, श्री लक्ष्मण पाटील ,श्री ताराचंद्र पवार, श्री निलेश शर्मा (बालू भाऊ) ,श्री संजय मोहकर, श्री भानुदास शिंपी, श्री कैलास पवार, शशिकांत शिंपी ,तुषार मोहकर व ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष सोनवणे ,योगेश कोळी,निलेश बडगुजर या वेळी उपस्थित होते.