भाजप शासन राहिले असते तर विकासाठी मोठा निधी दिला असता-: माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार

24

🔸कोरोनात पटले आहे, धनशास्त्र पेक्ष्या पर्यावरण शास्त्र महत्वाचे

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.4सप्टेंबर):-आमदार जयकुमार रावल यांचा नेतृत्वाखाली दोडाईचा शहराचा विकास होत आहे. दोंडाईचा नगरपालिका मार्फत माझी वसुंधरा या अभियान अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले आहे. राजपथ वर अब्दुल हमीद स्मारकने सुरुवात झाली असून चौफुलीवर शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारत असल्याने समानता साधली आहे. भाजप शासन राहिले असते तर दोडाईचा नगरपालिकेस मोठया प्रमाणात निधी दिला असता असे प्रतिपादन माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोडाईचात केले. दोडाईचात नगरपालिके मार्फत राजपथ वर केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात
मुनगंटीवार बोलत होते.

माजी वनमंत्री,अर्थ नियोजन सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल, लोकनेते सरकारसाहेब रावल,लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुवर रावल,उपनगराध्यक्ष नबु पिंजारी,भाजप जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, बबन चौधरी, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण महाजन, बांधकाम सभापती निखिल जाधव, वैशाली महाजन,कामराज निकम,कल्पना नगराळे,चंद्रकला सिसोदिया, मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम,डी एस गिरासे,रवींद्र उपाध्ये, जितेंद्र गिरासे,कृष्णा नगराळे , डॉ माधुरी बोरसे,अनिल वानखेडे,भरतारी ठाकूर, सभापती,सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आदी स्टेजवर उपस्थित होते.तसेच रोटरी पतपेढी चेअरमन सुरेश जैन, हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन,किशन दोधेजा, किशन गिरधारीलाल, रमेश पारख ,प्रदीप कागणे, मंगला धनगर,युसूफ कादियानी,राजू धनगर,ईश्वर धनगर आदि उपस्थित होते.

दोडाईचा नगरपालिका मार्फत माझी वसुंधरा या अभियान अंतर्गत नयनवृक्ष वनराई यात-नंदुरबार चौफुली ते गर्ल्स स्कूल दरम्यान असलेल्या राजपथवर मुख्य आचार्य शैलेश देशपांडे, महेंद्र जोशी,प्रदीप पुरानिक, अमोल भट या पुरोहितांचा मंत्रोपचारात विविध शोभिवंत 251 वृषाचे विधिवत पूजन करून 251 जोडप्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.प्रत्येक वृक्षाला क्रमांक देण्यात आला आहे. याच रस्त्यावर सुशोभित 140 पथदीप विद्वदूत पोल लावण्यात आलेत.या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की-नगरपालिका मार्फत पर्यावरणाचा सैनिकांचा सत्कार करण्यात आला. आमदार जयकुमार रावल यांनी विकास निधीचा वापर करून दोडाईचा शहराचा विकास करून गावाचे रूप बदलण्याचा प्रयत्न केला.आमदार रावल यांचा नेतृत्वाखाली शहराचा विकास होत आहे .राजपथ वर अब्दुल हमीद स्मारकने सुरुवात झाली असून चौफुलीवर शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारत असल्याने समानता साधली आहे.आम्ही लाल गाडीवर नव्हे तर लाल रक्तावर प्रेम केले. सत्ता गेल्याचे दुःख झाले नाही.

परन्तु भाजप शासन राहिले असते तर दोडाईचाला निधी दिला असता. पुनः भाजप शासन येणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. वडाचे झाड लावणारा सात निवडणूकित विजयी होतो. आमदार जयकुमावर रावल आपण झाडे लावा, आपले शासन आल्यावर आपणास मंत्री बनविण्याची जबाबदारी माझी आहे.वन पुढचा जन्मा पर्यंत कामाला येईल.झाडे ऑक्सिजन देत असून ऑक्सिजनचे महत्व कोरोनात पटले आहे.धनशास्त्र पेक्ष्या पर्यावरण शास्त्र महत्वाचे आहे.आमदार जयकुमार रावल- म्हणाले की-आजचा वृक्षारोपण मुळे शहराचा सौंदर्यात वाढ होणार असून पर्यावरण संतुलित होणार आहे. राजपथावर सिझन नुसार उपयोगाची झाडे व फुलझाडे लावली आहेत.शहीद हमीद यांचे स्मारक उभारणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ उभरणारआहे.

समृद्धी व संस्कृती टिकावी म्हणून विविध समाजसुधारक पुतळे उभारणार. वरवाडे भागात समाज मंदिर बांधले. कचऱ्यापासून मिथेन गॅस निर्मिती होणार आहे.30 सप्टेंबर पावेतो फिल्टर पाणी देणार.चौथ्या शनिवारी वाहन मुक्त दिवस पाळणार.पर्यटन नगरी उभारायची होती,परंतु आमचा निधी आदित्य ठाकरे यांनी मुख्याधिकारी यांचा कडून मागून घेतला असल्याने पर्यटन विकास थांबला आहे.आपले सरकार आल्यावर दोडाईचा विकासासाठी मोठया प्रमाणात निधी द्यावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांचा कडे केली.याच कार्यक्रमात-दोडाईचा व परिसरात उत्कृष्ट वृक्षारोपण केल्याने-माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हस्ते- सरकारसाहेब रावल,हस्ती बँकेचे कैलास जैन, अहिंसा ग्रुपचे राजेश मुनोत,माजी नगरसेवक रमेश पारख,कायसिंग भिल यांचा सत्कार करण्यात आला. कायसिंग भिल यांनी वृक्षारोपण केल्याने आमदार जयकुमावर रावल यांनी 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.सूत्रसंचालन ए वाय शेख यांनी केले. दोडाईचा नगरपालिकेने केलेली कामे,सुविधा,कोरोणात केलेले कार्य -प्रवीण महाजन यांनी प्रास्ताविकेत सांगितले.