मारकंडा (कं) येथील आरोग्य केंद्र रात्रीच्या वेळेस वाऱ्यावर- एकही अधिकारी कर्मचारी उपस्थीत नाही

28

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी प्रतिनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.4सप्टेंबर):- तालुक्यात येत असलेल्या मार्कंडा कंनसोबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी सायंकाळी सहा साडेसहा चे दरम्यान दुचाकीवरून पडलेल्या दोन इसमांना मार्कंडा कंनसोबा येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद शेडमाके यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तिथे एकही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नव्हते. या दोन्ही रुग्णांच्या पायाला दुखापत झाली होती. या रुग्णावर उपचार करण्याकरिता एकही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नव्हते. एवढेच नाही तर रात्रपाळीला असणारा परिचर हा सुद्धा गायब होता.

या आरोग्य केंद्रात या दोन रुग्णांना आणल्यानंतर एक तासाने वाहन चालक मारोती गोरडवार हे आले व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री बुरे यांना दूरध्वनीवर सांगितले असता औषधी वितरक श्री झाडे यांना बोलावून या रुग्णांवर इलाज करून देण्याचे सांगितले. वाहन चालक यांनी औषधी वितरक श्री झाडे यांना बोलावून आनले व तात्पुरता इलाज करून देण्यात आला. रात्रपाळीचे कर्मचारी न ठेवता आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडून जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता श्री अरविंद शेडमाके यांनी केली आहे
——
या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बुरे यांचेशी रात्रो संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही
———–‘———————-