माझे शिक्षक

29

मार्गदर्शक जीवनी
पथिक आहे तुमचा
दीपमाळ वाटेतील
सूर्य तुम्ही आयुष्याचा //१//

बालकाचे तेजत्वांनी
नक्षी जीवनसामर्थ्य
यश पहाट दावूनी
भरी आयुष्यात अर्थ //२//

ज्ञानज्योत पेटवूनी
विषमतेला जाळीली
सदाचार शिकवूनी
सन्मानवाट दाविली //३//

बंधुभाव मित्ररूपी
साहस हे उडण्याचे
उदारता दातृत्वाची
शेवट अडसरांचे //४//

तुमच्याकडुनी शिकू
कर्तुत्वरूपी उरणे
ध्येय बाळगुणी जगी
आयुष्य जगू सेवेने //५//

ऋणी माझ्या शिक्षकांचा
वंदितो कर जोडुनी
नित राहो आशीर्वाद
आयुष्य हे जगतांनी //६//

✒️राजेंद्र धर्मदास बन्सोड(आमगाव(गोंदिया)मो:-8275290252