मांडवा शेतशिवारात ॲपद्वारे ई -पिक पाहणी

33

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.4सप्टेंबर):- महाराष्ट्र शासनाने राज्यात ई-पिक पाहणी हा प्रकल्प दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून सुरू केला आहे. दि.१५ ऑगस्ट ते दि.१५ सप्टेंबर या कालावधीत शेतकरी खातेदाराची ॲपवर प्रत्यक्ष नोंदणी व शेतकरी स्वतः आपल्या शेतातील खरीप हंगामाच्या पिकाची फोटोसहित माहिती आपल्या मोबाईलमध्ये ई – पीक पाहणी ऍपद्वारे भरू शकणार आहेत.

ती माहिती कशी भरावी याबाबत तलाठी धनश्री आहाळे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन मांडवा येथील उंकडा मंदाडे यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांना माहिती दिली आहे.

आपल्या शेतातील पिकाची माहिती अगदी सुलभ पध्दतीने कशी भरावी याबाबत सांगण्यात आले. मोबाईलमध्ये ई पिक पाहणी हे ऍप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढून त्यामध्ये पिकाचे क्षेत्र भरावे त्याचप्रमाणे शेतामधील विहीर, पॉलीहाऊस, शेततळे, बोअरवेल, बांधावरील झाडे या सगळ्यांची नोंद देखील पिक पेरा भरतांना करता येईल
अशी माहिती दिली .

यावेळी तलाठी धनश्री आहाळे ,पो.पा.दत्तराव पुलाते, सोसायटी अध्यक्ष वसंता आडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण,शेतकरी रमेश ढोले,देविदास पुलाते, उकंडा मंदाडे, वैभव ढोले,लहु चव्हाण, कृष्णा आडे, शुभम राठोड तसेच ईत्यादी शेतकरी बाधंव उपस्थित होते.