प्रा.डी .एम ललवाणी यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर

✒️भुसावळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भुसावळ(दि.4सप्टेंबर):- भुसावळ येथील श्रीमती प क कोटेचा महीला महाविद्यालया चे माजी प्रभारी प्राचार्य व प्राध्यापक यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार” जाहीर करण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्षा संदीप वाघ यांनी कळविले आहे. प्राध्यापक ललवाणी यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक,अध्यात्मीक कार्यात सहभाग घेतला असून आपल्या 32 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक विद्यार्थीनी उपयोगी उपक्रम पार पाडले आहेत.स्व.कपुरचंदजी कोटेचा व्याख्यानमाला, जैन संघटना ऊपक्रम,कर्मचारी पतपेढी हि त्यांच्या कार्याची मैलाची दगड ठरली आहेत.

लवकरच कोणत्याही शिक्षकाने आजतागायत न केलेलं कार्य म्हणजे आपल्या विद्यार्थिनींच्या कार्यावर पुस्तक लिहिण्याचं त्यांचा मानस असून हे पुस्तक लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असून अनेक दुःखद प्रसंगांना सुद्धा ते सामोरे गेले आहेत . त्यांनी समाजाविषयी व शैक्षणिक विषयी आपली नाळ मात्र कधीच सोडली नाही. लवकरच ते स्वतःच्या गो शाळेला सुद्धा वाहून घेणार आहे. त्यांच्या अशा अनेक बहुविध कार्याचा सन्मान म्हणून संस्थेने त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक म्हणून निवड केली आहे हा पुरस्कार त्यांना लवकरच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED