रासपचे नेते जीवने पाटील यांचे वतीने आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे अमरण उपोषण

38

✒️देवणी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

देवणी(दि.4सप्टेंबर):-दिनांक 9 सप्टेंबर 2021 रोजी आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे देवणी तालुक्याच्या विविध विकास कामाच्या व लातूरचे जिल्हाधिकारी व देवणी तालुक्याचे तहसीलदार व देवणी तालुक्‍याच्या विविध विकास कामाच्या संदर्भात देवणी तहसीलच्या इथे दोन वेळा अमरण उपोषण होऊनसुद्धा गेल्या अडीच महिन्यांपासून हे अधिकारी फक्त आश्वासन वर आश्वासन देतात अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही म्हणून औरंगाबाद आयुक्त कार्यालय येथे 9 सप्टेंबर 2021 रोजी रासपचे नेते आमरण उपोषणासाठी बसणार आहेत .

देवणी येथील तालुका व शहरातील पंचायत समिती व पंचायत समितीचे ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक अभियंता व तालुका कृषी अधिकारी सह कृषी अधिकारी वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता व तालुक्यातील सर्व डिपारमेंट चे कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे व तोगरी ते तुरोरी रस्त्याचे अर्धवट काम असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला तरी सा भा अभियंत्यावर व गुत्तेदाराव मृत्य कारणीभूत ठरल्याचे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व न्यायालयाची अत्यंत अनिष्ट दर्जाचे काम झाल्याने त्या गुत्तेदार आचा परवाना तात्काळ रद्द करावे व अभियंत्यास निलंबित करावे अशी मागणी रासपचे नेते जीवने पाटील यांच्या वतीने करण्यात आले.