मा. जि. सदस्य अॅड.सुरेश हात्ते यांनी पुर ग्रस्त भागाची पाहणी करुन प्रशासनास दिले निवेदन

27

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.4सप्टेंबर):-सोमवार, दि.३०/31 ऑगस्ट रोजी गेवराई तालुक्यात आतीवृष्टी झाल्याने तालुक्यातील तलवाडा, जातेगाव, धोंडराई आदी महसुल मंडळातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती आणि पिकांचे नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी शेती पुर्णपने खरडून वाहून गेल्याचे भयावह चित्र या ठिकाणी पाहणी अंती दिसुन आले असून शेतातील ऊस, कापूस, सोयाबीन यांसह मोसंबी सारख्या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक झाले ल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते वाहून गेल्याने व पुल क्षतिग्रस्त झाल्याने आनेक गावाचे संपर्क तुटले असुन अनेकांच्या घरात पुराचे पाणी गेल्यामुळे मोठी पडझड झाली आहे.

तलवाडा भागातील राजुरी मळा, रामनगर, गंगावाडी, राहेरी, बोरगावथडी, अंतरवाली आदी नुकसानग्रस्त भागाची तलवाडा गटाचे मा.जि.प.सदस्य अॅड.सुरेश हात्ते यांनी पाहणी करुन शेतकर्यांच्या व पडझड झालेल्या या भागातील रहिवाशांना शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई देन्याची मागणी तालुका व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन निवेदनाव्दारे शासनास केली आहे.

तसेच तलवाडा येथील त्वरिता गाव तलवाच्या बाजूने लगोलग वाहत आसलेल्या पैठण ऊजव्या कालव्याचा एक पुल आर्ध्यापेक्षा अधिक वाहून गेल्यामुळे गाव तलावास धोका होण्याची शक्यता अधिक आसल्याने पाट बंधारे विभागाला पाहणी करुन हा पुल दुरुस्त करन्याची मागणी देखील अॅड.सुरेश हात्ते यांनी संबधित विभागाकडे निवेदनाव्दारे केली आहे.