ब्रम्हपुरीत ग्राम रोजगार सेवकांचे काम बंद आंदोलन

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.4सप्टेंबर):- ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक सन २००७ पासून कार्यरत असून आजही उपेक्षित जिवन जगत आहेत. मागील १४ वर्षापासून काम करत असताना अनेक अडचणी ना समोर जावे लागत आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तसेच जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांनी कामबंद आंदोलन काल दिनांक ३ संप्टेंबर पासून सुरू केले आहे.सध्या महाराष्ट्र विधानसभा मधील महात्मा गांधी रोजगार हमी योजना समिती दौरा केला असुन समिती प्रमुख आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांना अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले.

याच्या प्रमुख मागण्या मार्च २०२१ शासन निर्णयानुसार मनुष्य दिनाच्या गणणा करून दर महिन्याला मानधन देण्यात यावे २) चार वर्षाची सेवा लक्षात घेऊन शासन सेवत कायमस्वरूपी समावेश करण्यात यावे.

३) मागील दोन वर्षापासून थकीत मानधन व प्रवास भत्ता त्वरित देण्यात यावे. ४) २३ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत संगणक परिचालकडुन हजेरी प्रत्रक निर्गमित करणे.
५) ग्रामपंचायत अर्तंगत होणाऱ्या विविध योजनेतील विकास कामातील मजुरी पेंमेट घरकुल योजनेप्रमाणे हजेरी प्रत्रक मगोरा ग्रारोहयो शासन निर्णय निर्गमित करणे. अशा अनेक प्रकारच्या समस्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी विनायक राखडे, गुरुदेव ढोरे, नारायण नवघडे, बाळकृष्ण शेंडे, चंदु जल्लेवार, मिथुन चंहादे, मनिष गिरी, आदी ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.