कुंडलवाडी येथे संत शिरोमणी सेना महाराज पूण्यतिथी उत्साहात साजरी…

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.4सप्टेंबर):- तालिक्यातील कुंडलवाडी येथील पांडूरंग दिमलवाड यांच्या यांच्या निवासस्थानी अाज दिनाक 4 सप्टोंबर2021 रोजी नाभिक समाजाचे आराध्य कुल दैवत संत शिरोमणी संतसेना महाराज यांची 388 वी पूण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष सायलु नारायण अटनमवार,तर प्रमुख पाहुणे तालुकाध्यक्ष लिंगुराम सायलु पय्यावार,पांडूरंग दिमलवाड हे उपस्थ्तित होते.

सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संतसेना महाराज यांच्या प्रतिमेस पूष्पहाराने अभिवादन करण्यात आले.यावेळी गंगाधर बोडगमवार,जयराम अष्टमवार,सुरेश शेरीयाल,काशीराम अटनलवार,हणमंत अष्टमवार,प्रकाश गायकवाड,अंकुश अष्टमवार यांच्यासह नाभिक समाजाचे महिला व पुरूष मोठ्या प्रमाणात अपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED