“एम.आय.टी. पुणे बिझीनेस इनक्युबेटर तर्फे मेक इन इंडिया अंतर्गत भारतातील पहिल्या अल्कलाईन वॉटर आयोनाजर ची निर्मिती व शुभारंभ !”

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.4सप्टेंबर):- भारत ही आजाराची सर्वात मोठी बाजारपेठ बनली असुन याकरिता प्रामुख्याने दुषीत पाणी ही जबाबदार असून याला स्वच्छ करण्यासाठी मार्केट मध्ये प्युरिफायरचा उपयोग सर्रासपणे केला जातो. पण या मागे सर्वात मोठे षढयंत्र म्हणजे या प्युरिफायर मुळे पाण्यात असलेले आवश्यक मिनरल काढल्या जातात व त्यामुळे इम्युनसिस्टम कमी होतो. यामुळे रोगांचे प्रमाण बळावले जाते. कारण मानवी शरिरामध्ये ७२% पाणी असल्यामुळे प्रमुख भाग म्हणजे पाणी होय. (डब्ल्यु.एच.ओ. यांनी आर. ओ. चा उपयोग शरीरासाठी हानीकारक आहे हे स्पष्टपणे सांगितले आहे) तसेच दि. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार आर. ओ. प्युरिफायर विकण्यास बंदी घातलेली आहे.

दहा वर्षाच्या रिसर्च नंतर एम. आय. टी. पुणे यांच्या साह्याने श्री. सदानंद उमाळे, राजश्री राऊत, सुयोग सपकाळ यांनी भारतातील पहिल्या “अल्कलाईन वॉटर आयोनायझरची निर्मीती करून भारतातील प्रत्येक मानवाकरिता हे पाणी वरदान ठरणार आहे. कारण या पाण्यामुळे (१) रोगप्रतिकारक शक्ती वाढते (२) पचनसंस्थेच्या कार्यात मदत करते (३) शरिरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते (४) पाण्यातील पी. एच. संतुलीत ठेवते (५) कावीळ, टाईफाईड, मधुमेह इत्यादी संक्रमीत रोगांपासून वाचविते. (६) कॅन्सर, स्ट्रोक, अ‍ॅसिडीटी व अन्य पोटासंबंधी विकारांपासून दूर ठेवते, ५) हृदय, किडणी, लिव्हर चे आरोग्य वाढवितो. ६) चरबी कमी करते ७) तारूण्य टिकवून ठेवते. ८) हाडे मजबूत करते. ९) त्वचा ताजीतवानी ठेवते. १०) नळाच्या पाण्यापेक्षा उत्तम चव मिळते.

सध्या आपला भारत हा महामारीच्या लाटेतून जात आहे. त्यामुळे प्रत्येक भारतवासियाची रोगप्रतिकारक शक्ती वाढणे महत्वाचे ठरले आहे. या हेतूनेच अल्काईन इंडिया आत्ताच्या काळात हे उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावं यासाठी निकराचे प्रयत्न करत आहे. तथापि ही स्टार्टअप असल्यामुळे उद्योगजगताची साथ व सहाय्य अपेक्षित आहे. उद्योगजगताने सीएसआर अंतर्गत हे उत्पादन समाजाला उपलब्ध करून द्यावे, तसेच लोकांच्या कल्याणासाठी कार्यरत असणारे ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था त्याचप्रमाणे बिल्डर्स यांनी सर्वांनी यामध्ये एकत्र येऊन सहयोग दिला तर संपूर्ण भारतामध्ये हे उत्पादन पोहचविणे व त्याद्वारे भारतवासियांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे शक्य होणार आहे.

याकरिता एम आय टी विद्यापीठाचे संस्थापक व विश्‍वस्त आणि एमआयटी, टीबीआय चे संचालक – प्रा. प्रकाश जोशी आणि एम.आय.टी. टीबीआय चे मुख्य अधिकारी- मा. श्री. अभिजीत साठे यांचे मौल्यवान सहकार्य लाभले आहे. अधिक माहिती करिता www.Alkineindia.com या संकेत स्थळाला भेट दयावी.

पुणे, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED