आशा स्वयंसेविका व अंणगनवाडी सेविकाच खरी कोविड योद्धा .प. स. मा़ उपसभापती लक्ष्मी बाई गरुड यांचे प्रतिपादन

27

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.4सप्टेंबर):-येवला तालुक्यातील
भारम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा स्वयंसेविका वअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कोविड योध्दा म्हणून, येवला पंचायत समितीच्या उपसभापती श्रीमती लक्ष्मीबाई गरूड यांच्याकडून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, कोरोना सारख्या महामारीने महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशामध्ये थैमान घातले, परंतु कोरोनाची पहिली लाट जेव्हा आली तेव्हा गावातील एखाद्या घरामध्ये कोरोना पेशेंट निघाले, किंवा दगावले, तर त्यांच्या परिवारातील रक्तातील नातं असलेले लोक सुद्धा जवळ येत नव्हते, अशा परिस्थितीमध्ये त्याठिकाणी जाऊन आपल्या जीवाची किंवा परिवाराची पर्वा न करता सर्वेक्षण करण्याचे काम अाशा व अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

म्हणून खरे कोवीड योध्दा अाशा स्वयं सेविका व अंगणवाडी सेविकाच असल्याचे गरूड यांनी आपल्या भाषणातुन सांगितलं,
त्याच बरोबर शासनाकडून पोषण आहार महा अभियान राबविण्यात येत आहे त्याचा शुभारंभ व उदघाटन श्रीमती गरूड, व तालुका वैदकिय आरोग्य अधिकारी डॉ.हरीश नेहेते, यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी सुवर्णा आमले व श्रीमती गवळी यांनी महिलांना आहाराबाबत माहिती दिली, कोरोना काळात सेविकांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हरीश नेहेते यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई गरूड यां होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी हरीश नेहेते, भाऊसाहेब गरूड, भारम येथील मा, सरपंच दत्ता जेजुरकर महिला बा, क, विस्तार अधिकारी अनील जराड, आरोग्य विस्तार अधिकारी राजेंद्र खैरे, कराड नाना, सुवर्णा आमले, गवळी मॅडम, ई, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय जेजुरकर यांनी केले, त्या प्रसंगी डॉ सुशांत पाटील डॉ काचंन घोडेराव, डॉ सुनीता डोंगरे, मनीषा पैठणकर, आरोग्य सेवक विजय नागरे, ़अरवीद धिवर, सुनील पगारे, सुरेखा शिन्दे, लंका खैरनार, याचा सह राजापूर गटातील सेवीका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या,