जेव्हा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा फौजदार होतो

24

🔹प्रामाणिकपणा व कर्तुत्वा च्या जोरावर श्री.पांडुरंग माधव डघळे झालेत पोलीस उपनिरीक्षक

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.4सप्टेंबर):-येवला तालुक्यातील पाटोदा (1 सप्टेंबर 20 21) येथील श्री. माधव डघळे हे सामान्य शेतकरी, त्यांना तीन मुले , थोरला पांडुरंग, त्याच्या पाठचा सुरेश , धाकटा अर्जुन, व मुलगी लता असा हा परिवार शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते. मोठा मुलगा पांडुरंग शांत,संयमी, प्रामाणिक स्वभावाचा, पाटोदा येथील जनता विद्यालय येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बालपणापासूनच देशाबद्दल व समाजाबद्दल मनामध्ये प्रचंड आवड असल्याने दहावीनंतर मित्रांबरोबर आझाद हिंद सेना नावाचे मंडळ स्थापन करून देशसेवे चे पहिले पाऊल टाकले.

पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व पुढे 1994 मध्ये पुणे विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्याच वर्षी म्हणजे 1994 ला राज्य राखीव दल (एस आर पी) मध्ये पोलीस शिपाई म्हणून नवी मुंबईमध्ये रुजू झाले, आलेल्या संधीचे सोने करायचे हे या ज्याच्या नावातच पांडुरंग आहे अशा या देव माणसाने आपल्या कर्तृत्वाचा ठसा आपल्या कामगिरीने उमटवण्याचा जणू निश्चयच केला, आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर कमांडो ,ऑफिस असिस्टंट, ग्रेनेड, अधि क्षेत्रात वेगवेगळे ट्रेनिंग पूर्ण करून गडचिरोली, केरळ ,पोंडीचेरी, अशा विविध ठिकाणी सेवा बजावून आपल्या कर्तुत्वाने आपल्या रक्तामधली देशाप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली, याच कामाची पावती म्हणून या”*पांडुरंग*”नावा च्या देव माणसाला २६ वर्षाच्या देशसेवेत तब्बल १६३ वेगवेगळे बक्षिसे व प्रशस्तीपत्र मिळाले, विशेष गोष्ट म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयाचे” उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षक”म्हणून पारितोषिकही मिळाले, यानंतर केवळ पोलीस हवालदार पदावर न राहता वरिष्ठ पदाला गवसणी घालण्यासाठी 2014 मध्ये अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली, अपेक्षेप्रमाणे व स्वतःच्या आत्मविश्वासाने सदर परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यात श्री पाङुंरग डगळे उत्तीर्ण झाले, परंतु सदरच्या परीक्षेचे प्रकरण हे न्याय प्रविष्ट झाल्याने त्यांना उपनिरीक्षक या पदावर दावा करण्यासाठी मॅट मध्ये जावे लागले.

पुढे त्यांनी 1994 ते 2006 या कालावधीत नाशिक पोलीस अकॅडमी येथे तीन वर्ष प्रशिक्षक व अकरा वर्ष कॅन्टीन मॅनेजर म्हणून काम पाहिले, परंतु उशिरा का होईना त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ व आपल्या कार्यकर्तृत्वाला न्याय मिळाला ,आणि नुकतीच मॅटने त्यांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्तीचा मार्ग मोकळा केला, पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांना नुकतेच धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे, अशा या भुमिपुत्राचा येवला तालुक्यात पाटोदा विखरणी आडगाव रेपाळ आधी परिसरांमध्ये व सगेसोयरे यांमध्ये मित्र परिवारामध्ये सामाजिक संस्था राजकीय कार्यालय शैक्षणिक संस्था आदी ठिकाणी नागरी सत्कार केला जात आहे, त्यांच्या या यशाबद्दल येवला तालुक्याचे ज्येष्ठ नेते अंबादास जी बनकर, डॉक्टर मोहन शेलार, जि प सदस्य संजय बनकर ,ज्येष्ठ नेते विठ्ठल शेलार, पाटोदा गावचे सरपंच प्रताप पाचपुते ,तसेच त्यांचे स्नेही अति जिवलग मित्र एजाज भाई देशमुख , हारूनभाई शेख, अलीम देशमुख, पञकार उसमानभाई शेख आदींनी त्यांचा सत्कार केला .