दोंडाईच्यात येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साध्या पद्धतीने साजरी…

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.4सप्टेंबर):-(श. प्र.) शहर नाभिक हितवर्धक संस्थेच्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.दरवर्षी संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असायची मात्र गेल्या दोन अडीच वर्षापासून कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर पालखी मिरवणूक न काढता शहरातील पंचवटी मंदिरात सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सैंदाणे, तालुका अध्यक्ष रविंद्र चित्ते, शहर अध्यक्ष देविदास चित्ते, सचिव सुनील सैंदाणे, दुकानावर संघाचे शहर अध्यक्ष किरण सुर्यवंशी, उपाध्यक्ष महेंद्र चित्ते, अनिल ईशी, छोटू महाले, जेष्ठ सल्लागार भावराव सैंदाणे, पी. यू. पावर, गोकुळ सैंदाणे, दिलीप सैंदाणे, पत्रकार समाधान ठाकरे, लोटन पवार, मनोहर निकम, योगेश मिस्त्री, राजेश मिस्त्री, गुलाब पवार, महिला शहर अध्यक्ष शोभाताई चित्ते, ज्योती सैंदाणे, आशा चित्ते, आदी शहरातील सर्व समाज बांधव महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धार्मिक , महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED