आता आरक्षण हक्क कृती समितीचा 27 ऑक्टोंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.4सप्टेंबर):-आरक्षण हक्क समितीच्या वतीने राज्यातील सर्व मागासवर्गीयांच्या संघटनांनी समाज, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी-26 जून रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढूनही कोणतीही दखल घेतली नाही.

त्यामुळे सरकारच्या विरोधात मागासवर्गीयांत अधिक तीव्र असंतोष पसरला असल्याने आता *27ऑक्टोंबर रोजी* महाराष्ट्रातील सर्व SC,ST,DT,NT,SBC,OBC समाज घटक , विद्यार्थी,कामगार, कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या संघटनांचा धडक मोर्चा काढण्याचा निर्णय आरक्षण हक्क कृती समितीची कोअर कमिटी,राज्य प्रतिनिधी, जिल्हा निमंत्रक व समन्वयक यांच्या दि.24 व 26 ऑगस्ट रोजी च्या बैठकीत घेण्यात आला.

तसेच धडक मोर्चाच्या जनजागृती व व्यापक सहभागासाठी विभागीय,जिल्हा, तालुका स्तरीय बैठका व पुणे येथे *सप्टेंबर 2021 मध्ये* सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांची *राज्यस्तरीय गोलमेज परिषद* घेण्यात येणार असल्याचे कोअर कमिटी सदस्य तथा राज्य निमंत्रक सर्वश्री हरिभाऊ राठोड,(माजी खासदार ) सुनिल निरभवने,अरुण गाडे, एस. के. भंडारे, एन्. बी. जारोंडे, सिद्धार्थ कांबळे, आत्माराम पाखरे, संजीवन गायकवाड, डॉ. नितीन कोळी, शरद कांबळे, डॉ. संजय कांबळे बापेरकर, संजय घोडके, प्रा. मधुकर उईके, अनिलकुमार ढोले, संजय खामकर, फरेन्द्र कुतिरकर, राजकुमार जवादे, डॉ. बबन जाधव, सुरेश पवार , शामराव जवंजाळ , अरुण जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED