रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे जिल्हा प्रशासनाचा निषेध;दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही -राजेंद्र जगताप

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.4सप्टेंबर):-दिनांक 28 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.रामदास आठवले यांचा पूरग्रस्त भागाची पाहणी व पूरग्रस्त पीडितांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप असा नियोजित दौरा पाटण येथे होता प्रोटोकॉलनुसार केंद्रीय मंत्री दौऱ्यावर असताना ज्या शासकीय सुविधा जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जातात त्या सुविधा यावेळी रामदास आठवले यांना दिल्या गेल्या नसल्याने त्यांना खूप त्रास झाला असे दिसून आले त्या उलट इतर मंत्री आले.

असता वेगळ्याच प्रकारची सर्व सुविधा जनक वाहने दिली जातात असा दुजाभाव करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा खटाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या पदाधिकार्या मार्फत पत्रक देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे जिल्हा उपअध्यक्ष कुणाल गडांकुश, तालुका अध्यक्ष राजेंद्र जगताप तालुका उपाध्यक्ष अजित कंठे, अण्णा कंठे ,विजय कंठे संतोष भंडारे, योगेश हिरवे,सन्नी कमाणे इत्यादी उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED