भविष्यात “म्हसवडकर ग्रुप”च्या चांगल्या कामाची वेळोवेळी दखल घेतली जाईल – असिस रे,अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ पूना डाउन टाऊन

14

🔸रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यावेळी व्यक्त केली भावना

✒️सचिन सरतापे (प्रतिनिधी,म्हसवड)मो9075686100

म्हसवड(दि.4सप्टेंबर):- तुम्ही सर्वांनी एकत्र येवून जे काम केले आहे त्यापुढे आम्ही केलेले काम काहीच नाही तुमच्या म्हसवडकर ग्रुपचे व या ठिकाणी रुग्णसेवा देणारे डाॅक्टर,नर्स, वॅडबाॅय स्वच्छता करणारे या सर्वाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे आज आमच्याकडुन जी अॅम्बुलन्स तुम्हाला देण्यात आली आहे त्याचा वापर चांगल्या कामासाठीच होईल हे तुमच्या कामावरुन दिसत आहे यापुढे ही तुमच्या चांगल्या कामाची वेळोवेळी दखल घेतली जाईल असे शेवटी श्री असिस रे अध्यक्ष , रोटरी क्लब ऑफ पुणा डाऊन टाऊन यांनी आम्ही म्हसवडकर कोव्हीड हाॅस्पिटलला अॅम्बुलन्स देते वेळी व्यक्त केले

महाराष्ट्रातील पहिले लोकसहभागातून सुरू असलेले आम्ही म्हसवडकर कोविड हाॅस्पिटलला पूणे येथेल रोटरी क्लब ऑफ डाऊन टाऊन , रोटरी डि ३१३१ यांचे वतीने आणि ग्रेट सॉफ्टवेअर लॅबोरेटरी प्रा. लि. पुणे ( GS Lab ) व फ्रिमेसन ऑफ द लेझ्ली विल्सन लॉज ४८८० E C यांचे आर्थिक सहयोगातून आणि कै. श्री.विठ्ठल बाबुराव पोरे यांचे स्मरणार्थ श्री.वैभव विठ्ठल पोरे यांचे माध्यमातून आम्ही म्हसवडकर ग्रुप संचलित आम्ही म्हसवडकर कोवीड सेंटर ( DCHC ) यांना अत्याधुनिक सर्व सोयींनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका भेट देण्यात आली त्याच्या लोकार्पण सोहळ्यास पूणे येथील श्री असिस रे अध्यक्ष , रोटरी क्लब ऑफ पुणा डाऊन टाऊन,श्री.शरद जी दुबे साहेब-जी एस लॅब्ज प्रा.लि.पुणे व लेझ्ली विल्सन लॉज,श्री.यझदी बाटलीवाला साहेब-रोटरी क्लब ऑफ पुणा डाऊन टाऊन व लेझ्ली विल्सन लॉज ,म्हसवड नगरीचे सुपुत्र व रोटरीचे राज्य समन्वयक श्री वैभव पोरे, जिल्हा बँकेचे संचालक मा.अनिलभाऊ देसाई,ए पी आय मा.बाजीराव ढेकळे , डॉ.प्रमोद गावडे, डॉ.रोहन मोडासे,मा.नितीन दोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.काकडे, डॉ.वाघचौरे, डॉ.शेळके मॅडम,रासपचे नेते मा.सचिन होनमाने,कारखेलचे सरपंच मा.शशिकांत गायकवाड यांच्यासह आम्ही म्हसवडकर ग्रुपचे सदस्य युवराज सुर्यवंशी,एल.के.सरतापे, कैलास भोरे, राहुल मंगरुळे,अॅड.अभिजीत केसकर, डॉ.राजेंद्र मोडासे,विजय धट, महेश सोनवले, डॉ.राजेश शहा,संजय टाकणे,प्रितम तिवाटणे, धनंजय पानसांडे, प्रशांत दोशी,खंडेराव सावंत, आदित्य सुकरे, शैलेश केंगार, सुहास भिवरे उपस्थित होते.

यावेळी .शरद जी दुबे -जी एस लॅब्ज प्रा.लि.पुणे हे बोलताना म्हणाले चांगल्या कामाची सुर्वात करण्यासाठी कोणी तरी पुढे आले तर आज जे तुम्ही केलेले चांगले काम पहावयास मिळाले तुम्ही एकत्र येवून कोरोना काळात रुग्णांना जी सेवा , आपुलकीची सेवा. दिली त्याला माझ्याकडे शब्द नाही तुमच्या कामापुढे आम्ही दिलेली अॅम्बुलन्सची मदत तुम्हाला जरी मोठी असली तरी.तुमच्या कामापुढे फारच कमी असुन तुम्ही लोकांसाठी केलेल्या कामाचे मोल ना अॅम्बुलन्स मध्ये ना पैशात मोजता येणार नाही तुम्ही एकत्र येवून अनेकांना जिवदान देण्याचे काम आहे असे शरद जी दुबे यांनी या वेळी व्यक्त केले
यावेळी वैभव पोरे म्हणाले अॅम्बुलन्स देणे हे काम अश्क्यप्राय होते मात्र गावांतील भाऊ बहिणीच्या आजी आजोबाच्या आरोग्यासाठी रोटरी क्लब ऑफ डाऊन टाऊन , रोटरी डि ३१३१ यांचे वतीने आणि ग्रेट सॉफ्टवेअर लॅबोरेटरी प्रा. लि. पुणे ( GS Lab ) व फ्रिमेसन ऑफ द लेझ्ली विल्सन लॉज ४८८० E C यांच्या आणि माझे वडील कै. श्री.विठ्ठल बाबुराव पोरे यांचे स्मरणार्थ हि अॅम्बुलन्स आम्ही म्हसवडकर ग्रुपला देताना अत्यानंद होत आहे जे काम शासकीय व खाजगीत उपचार होणार नाही असे महाराष्ट्रातील एकमेव माझ्या मायभुमीतील माझे बांधव माणुसकीच्या भावनेतून सर्वांचा जिव धोक्यात घालून निरपेक्ष भावनेने काम करत आहे.

आम्ही रोटरी क्लब ऑफ डाऊन टाऊनच्या माध्यमातून पुणे येथे तुम्ही म्हसवड मध्ये जसा दोन घास सुखाचे हा सुत्यजन्य प्रोजेक्ट लोकसहभागातून राबवला तसा आम्ही पूणे येथे सर्व झोपडपट्टी, रस्त्यावर राहणारे यांना आज ही अन्नदान करत आहे खोलीकडे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था,डाॅक्टर, नर्स वाॅडबाॅय आदी आरोग्यासी निगडी असणारे यौध्दे यांना सुका मेवा , सॅनिटायझर, मास्क आदी वस्तूंचे वाटप केले व करत आहे संत तुकारामांच्या अभंगात म्हटले आहे “शब्दे विना संवाद” या भावनेतुन या ट्रस्टने कोणते ही प्रश्र्न न विचारता केवळ आम्ही म्हसवडकरानी उभारलेल्या हाॅस्पीटल मध्ये २२’२४ स्कोर असलेल्या रुग्णांना रेमडिश्वर न देता केवळ औषधोपचाराव रुग्ण बरे करण्याची भावना त्यांच्या पर्यात पोहचल्यानेच अॅम्बुलन्स मिळाली याचा वापर म्हसवडकरांनी आजारी गरीब रुग्णांसाठी करावाअसे आव्हान वैभव पोरे यांनी व्यक्त केलेले
यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल देसाई म्हणाले कोवीडच्या काळात मुलगा वडिलांना पहात नव्हता तर यावेळी म्हसवडकर ग्रुप मात्र डाॅक्टर नसताना पाॅझीटिव्ह पेशन्ट जवळ जावून त्याची विचार पुस चौकशी करुन त्या रुग्णांना धिर देवून त्यांचे माणसिक आधार देत होते यामुळेच आर्धा रुग्ण बरा होत होता मंदिर, मज्जित, गुरुद्वारा, चर्च मधील देव बंद होते मात्र कोवीडच्या काळात काम करणाऱ्या या आम्ही म्हसवडकर ग्रुप असो वा आरोग्याचा स्टाप हा देवाच्या रुपात रुग्णांची सेवा करुन म्हसवड व पंचक्रोशीतील हजारोंचे जिववाचवणारे जिवनदायी सेंट्रल ठरले आहे.

घरच्या माणसाप्रमाणे सेवा केली त्या आरोग्य कर्मचाऱ्यांना काढुनी टाकते चुकीचे आहे त्यासाठी अधिकारी मंत्री यांचेसी चर्चा करुच तो पर्यंत सर्वांनी या कर्मचाऱ्यांना मदती साठी पुढे यावे असे आवाहन देसाई करुन पुढे. म्हणाले आम्ही म्हसवडकर ग्रुपला आज पूणेवाला ट्रस्टने अॅम्बुलन्स देवून मोठे काम केले आहे आमच्या भागात मेडिकल कॉलेजची गरज आहे त्यासाठी या ट्रस्टने पुढे यावे असे देसाई म्हणाले.यावेळी डाॅ प्रमोद गावडे यांनी आलेल्या पाहुण्यांना , कमी केलेल्या कर्मचारी , आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या कामाविषयी, व या सेंटरचे वैशिष्ट्य तळमळीने मांडतांना कर्मचारी यांच्या कामासाठी पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी लढा उभारावा असे डॉ गावडे म्हणाले.यावेळी नितीन दोशी, रासपा अध्यक्ष सचिन होणमाने, शशीकांत गायकवाड,कर्मचारी निलेश सरतापे यांनी कोवीड सेटर मध्ये १२ दिवस आलेले अनुभव सांगीतले.

याकार्यक्रमाची प्रस्तावना युवराज सुर्यवंशी यांनी आम्ही म्हसवडकर ग्रुपने वर्षभरात लोकहितासाठी केलेल्या कामाची माहिती दिली तर सुत्रसंचलन महेश सोनवणे यांनी आभार राहुल मंगरुळे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.जंगम सर,महिंद्रा शोरुमचे चिंचकर साहेब व ढोले साहेब,बंटी माने,सिध्देश्वर पोरे,गणेश माने, अविनाश मासाळ, माने गुरुजी ,कोविड सेंटर चे कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.त्यानंतर रुग्णवाहिका पुजन करणेसाठी श्री सिध्दनाथ मंदिर येथे आणण्यात आली.मंदिराचे सालकरी श्री कृष्णात नाळे, मठाधिपती श्री रविनाथ महाराज, श्रीमंत अजितराव राजेमाने यांचे हस्ते पुजन करण्यात आले.यावेळी तेजसिंह राजेमाने,अरिंजय शहा,अजितभई व्होरा, तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.