पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ(ओझर) नामकरण समितीला केंद्रीय आरोग्य मंत्री भारती ताई पवार यांचे आश्वासन

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.4सप्टेंबर):- पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ नामकरण समितीच्यावतीने आज रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री नामदार भारती ताई पवार
यांना ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यासाठी नामकरण समितीच्या वतीने मागणी पत्र सादर करण्यात आले.

नामदार भारती ताई पवार,आमदार देवयानी फरांदे,आमदार सीमा हिरे यांनी नामकरण समितीशी सविस्तर चर्चा करून हा विषय शासन स्तरावर मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करणार असे आश्वासन दिले.समिती बरोबर सकारात्मक चर्चा करून केंद्रीय उड्डाण मंत्री यांच्या समवेत समिती सदस्यांसह बैठक घेण्याचे आश्वासीत केले.

याप्रसंगी मुख्य निमंत्रक रिपब्लिकन नेते अण्णासाहेब कटारे,बाळासाहेब जी शिंदे,मदन अण्णा शिंदे,अनिल भाई गांगुर्डे,आदेश भाऊ पगारे, दिपचंद नाना दोंदे,भिवानंद आप्पा काळे,अनिल भाऊ आठवले,प्रशांत कटारे,सुनील साळवे,विक्रांत गांगुर्डे पञकार शातांरामभाऊ दुनबळे शिवाजी गायकवाड ,आदी उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED