पावडरने घरातील जुने भांडे, नवीन करून देणारी, सक्रिय टोळी उमरखेड येथे दाखल

🔸भगतसिंग वार्ड येथील महिलेची गळ्यातील पोत घेऊन अज्ञात इसम झाले पसार

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.4सप्टेंबर):-दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान दिपाली दत्ता पतंगे राहणार भगतसिंग वार्ड,उमरखेड हे आपल्या राहत्या घरी हातपाय स्वच्छ करीत असताना गळ्यातील सोन्याचे पोत (मंगळसूत्र) अंदाजे 4 ग्राम गळ्यातून काढून पायऱ्यावर ठेवले असता तेवढ्यात दिपाली पतंगे यांच्या घरासमोर तिघे, अनोळखी व्यक्ती आले त्यातील एक जण गाडी जवळ उभा होता व दोघेजण दाराजवळ आले.

असता त्यांनी दिपाली पतंगे यांना सांगितले की आमच्याकडे भांडे चमकण्याचे पावडर आहे तुमच्या घरातील खराब भांडे चमकून देतो तेव्हा दिपाली यांनी त्यांना थांबा म्हणाले मी घरातून कुकर घेऊन येते म्हणून त्या घरातील कुकर घेऊन बाहेर घेऊन आल्या अस्ता पायऱ्यावर ठेवलेली त्यांची चार ग्रॅम सोन्याची अंदाजे आठ हजार रुपये किमतीची पोत तीन अज्ञात इसम यांनी घेऊन पसार झाले.

त्या अज्ञात इसम यांना दिपाली पतंगे यांनी दिवसभर जवळपास सर्वच ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ते अज्ञात इसम कुठेही निदर्शनास आले नाही तेव्हा त्यांचे पती कामावरून घरी आल्यानंतर आठ वाजताच्या दरम्यान त्यांनी झालेला सर्व घटनाक्रम आपल्या पतीला सांगितले व त्यानंतर दोघेही पती-पत्नी यांनी पोलीस स्टेशनला जाऊन अज्ञात इसम यांचे विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी असे दीपाली पतंगे व त्यांचे पती यांनी तक्रारीत म्हटले आहे.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED