नांदेड येथील गौळ गावातील मातंग समाजाला डॉ. मिलिंद आवाड यांच्यामुळे मिळाला दिलासा

32

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.४सप्टेंबर):-दिनांक 31/ 8/ 2019 रोजी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये गौळ या गावी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या वादातून झालेल्या मातंग समाजातील लोकांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी वाद झाला होता त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील संबंधित तहसीलदार श्री मुंडे यांना भेटून निवेदन दिले व चर्चा केली आणि संबंधित येथील डी वाय एस पी कांबळे यांना भेटून येतील झालेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतला वादातून जे गुन्हे मातंग समाजावर दाखल झाले आहेत त्याच्यामध्ये काही सुशिक्षित तरुण यांच्यावरही गुन्हे दाखल झालेले आहेत तर ते मागे घेण्यासाठी डॉ मिलिंद आवाड यांनी संबंधित डीवायएसपी यांना विनंती केली.

व तसेच गावात तनावपुर्ण वातावरण राहू नये आणि प्रशासन व समाज यात मतभेद होऊन नये आणखी तणाव पूर्वक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन आणि मानवी हक्क अभियान आपल्या सोबत आहे असे सांगून मातंग समाजाचे सांत्वन केले व पोलीस प्रशासन ही आपल्या सोबत आहे तुमच्या कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही असे समजावून सांगून त्या भयभीत झालेला झालेल्या महिलांना, लहान मुलांना सर्व समाजाला विश्वास दिला.

मानवी हक्क अभियान गेल्या तीस वर्षा पासुन संपूर्ण महाराष्ट्रात दलित अन्याय-अत्याचार गायरान जमीन धारक व तमाम बहुजन समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करत आहे. नांदेड जिल्हातील कंधार तालुक्यातील गौळ या गावी जो प्रकार घडला त्याच्या साठी मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद आवाड साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन समाजाच सांत्वन केले आणि पुन्हा वाद होणार नाही. याच्यासाठी संबंधित अधिकारी सोबत चर्चा केली. त्यांच्यासोबत मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गवाले, मानवी हक्क अभियानाचे नेते कॉम्रेड संजय वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.