रहेबर-ए-जरीया फाउंडेशन च्या वतीने पत्रकार विश्वास मोहिते यांचा सत्कार

27

✒️कराड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कराड(दि.4सप्टेंबर):-रहेबर-ए-जरीया फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कोविड योद्धा त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी तिरंगा रक्षक चे संपादक विश्वास मोहिते यांचाही सन्मान करण्यात आला.

पाडळी(केसे) तालुका कराड येथील रहेबर-ए-जरीया फाउंडेशन तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मोफत औषधे वाटप आणि आरोग्य सल्ला शिबिराचे तसेच कोविड योद्धा सन्मान या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना महामारी ज्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

यामध्ये तिरंगा रक्षक चे संपादक आणि आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते,यांचाही सत्कार प्रमुख अतिथी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍडव्होकेट उदयसिंह विलासराव पाटील आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे,रहेबर-ए-जरीया फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष वसीमआक्रम शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाडळी (केसे) च्या सरपंच आशामा मुजावर होत्या.

यावेळी सुपने पोस्टाचे प्रमुख अधिकारी अर्जुन लांडगे, माजी सरपंच महंमदअली शेख,पाडळी (केसे)चे उपसरपंच सलीम मुजावर, माजी सरपंच अनिल कदम, ग्रामपंचायत सदस्य हाशम मुजावर, ग्रामपंचायत सदस्य आनंदा कदम ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर, ग्रामपंचायत सदस्य नयुम शेख, जान फाउंडेशनचे जावेद नायकवडी, मातोश्री ग्रुपचे नवाजबाबा सुतार, सामाजिक कार्यकर्ते साबिरमियाँ मुल्ला तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच पाडळी सह परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित माजी सरपंच महंमदअली शेख यांनी प्रास्ताविक केले,तर आभार असिफ नदाफ यांनी मानले