विजय गोपनपाळे हा सत्तावीस वर्षीय तरुण बेपत्ता

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.5सप्टेंबर):- शहरातील विजय गोपनपाळे वय वर्ष २७ हा अंकुश कानडे,रा.सावतानगर ,परळी वै.यांच्याकडे चालक म्हणून नोकरीस आहे.दि.०७.०२.२०२१ रोजी ट्रक मालक अंकुश कानडे यांच्याकडून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दहा हजार रुपये घेऊन, कोणालाही न सांगता निघून गेला आहे.निघून गेल्यापासून तो अंकुश कानडे यांच्याकडेही ड्रायव्हर म्हणून नाही.तो परळी व लातूर येथील घरीही आलेला नाही.घरच्यांनी इतर नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो कोणत्याही नातेवाईकांकडे गेलेला नाही व आजपर्यंत बेपत्ता आहे.वरील खबरीवरून क्र.१५/२०२१ प्रमाणे दाखल करून पोनि.यांच्या आदेशानुसार पुढील तपास पो.हे.काँ.होळंबे करीत आहेत.

बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.उंची ५ फुट,५ इंच.रंग निमगोरा ,केस काळे, अंगावर लाल रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पँट, पायामध्ये चप्पल, शिक्षण ६ वी पास आहे.कोणाला सापडल्यास योग्य बक्षीस दिले जाईल (नातेवाईकांच्या वतीने) खालील पत्त्यावर संपर्क साधावा.सावतामाळी परळी वै.,बीड. ,महाराष्ट्र . तसेच जुना औसा रोड, लातूर., महाराष्ट्र. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक ९४०५८०६०६२.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED