पुरुषोत्तम करणार पेठ बीड चे क्षेत्ररक्षण तर उद्धव होणार गढी चा शिलेदार

26

🔹जिल्हातील असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित मध्ये प्रवेश

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.५सप्टेबंर):-वंचित बहुजन आघाडीचे ध्येयधोरणे सर्वसामान्य माणसांच्या आशा-आकांक्षा आणि जीवनमूल्ये जोपासणारे असल्याने वंचित बहुजन आघाडी आयोजित संघटन समीक्षा व संवाद मेळाव्यात उस्मानाबाद, लातूर,नांदेड,परभणी, जालना, औरंगाबाद पाठोपाठ बीडमध्ये शेकडो तरुणाईं च्या प्रवेशाची लाट उसळली.

गढी जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत गढी येथील सतत दहा वर्ष गढी ग्रामपंचायत ताब्यात असलेले सरपंच उद्धव खाडे यांनी आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच बाळासाहेब मुळीक,माझी उपसरपंच,रंजीत नाकाडे माझी पोलीस पाटील,वैजनाथ जाधव, सखाराम पोहिकर,पठाण इसाक भाई,शेख उस्मान,पठाण मुबारक,पोपट नाकाडे,राजेंद्र आरसूळ, धोंडीबा ढगे,संजय पवार, कचरु पवार,युवराज धुरंधरे, विठ्ठल राऊत ,संतोष चव्हाण,भारत वडमारे असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वंचित च्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, उपाध्यक्ष गोविंद दळवी ,प्रदेश प्रवक्ता फारूक अहमद,महिला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट,विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला.

बीड येथील युवा सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम वीर यांनीही आपल्या सत्या ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांसह प्रचंड शक्ती प्रदर्शनात वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.आंबेजोगाई येथील बहुजन समाज पार्टीचे माजी सचिव अंगद कांबळे,धम्मचक्र मित्रमंडळाचे अध्यक्ष बबन पाचपिंडे,तर प्रहार संघटना अंबाजोगाई कार्याध्यक्ष अमोल कांबळे, दौलत सुरवसे,संतोष हनवते,रमेश रंधवे,कुंडलिक शिंदे,बाबासाहेब कांबळे, भगवान कांबळे,महादेव कांबळे,अतुल गायकवाड, भैय्या कसबे यांनीही आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडी प्रवेश घेतला.
या सर्व प्रवेशित तरुणांचे वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा कमिटीच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले.