तलवाड्याचा त्वरीता गाव तलाव ओवरफुल! सोंड वाहु लागली

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.5सप्टेंबर):-तालुक्यातील तलवाडा गावा लगट जवळपास सत्तर एक्कर च्या शेत्रात त्वरीता गाव तलाव असुन या गाव तलवातुन पैठणचा उजवा कालवा (पाट) गेल्याने या तलावाचे शेत्रात घट होऊन या तलावाचे शेत्र आज मितीला तीस ते पस्तीस एक्करच्या आसपास असुन पैठणचा उजवा कालव्याच्या मध्य स्थीने या तलवाच्या ऊरवरित शेत्रात गावक-यांनी आतीक्रमण करुन जमिनी कसलेल्या आहेत. या गाव तलावास सन 2012 पूर्वी थोडासा जरी पाऊस पडला तरी सोंड (सांडवा) वाहन्यास सुरुवात होत आसे कारण तलावात मोठ्या प्रमाणात गाळ व माती जमल्याने तळे ऊथळ झालेले होते.

परंतु सन 2012 काही वर्ष आधी पासुन ते 2012 पर्यंत तलवाडा व तलवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची बीकट परिस्थिति होती. गावक-यांच्या सतत च्या पाठ पुराव्या मुळे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर साहेबांनी दखल घेऊन क्रिसलिस फाउंडेशन पुणेच्या माध्यमातुन या तलवातुन गाळ व माती ऊपसा करुन ज्या शेतक-यांच्या जमीनी हलक्या पर्तीच्या आहेत त्या शेतक-यांना मोफत शेतात टाकन्याची वेवस्था करुन या गाळ व माती ऊपस्याव्दारे पुर्वी पेक्षा तळ्याची खोली जवळपास चार ते पाच परसच्या आसपास वाढवली होती. तेव्हा पासुन आज पर्यंत कधीच त्वरिता गाव तलावाची सोंड (सांडवा) वाहीला नव्हता परंतु या यंदाच्या पावसाळयात दिं 30/31 आगष्ट व दिं 4 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार आतीवृष्टी मुळे सांडवा (सोंड) प्रथमच धो धो वाहतांना दिसुन येत असुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आसलातरी बळीराजाची पिके वाया गोेल्याने मोठ्या प्रमाणात परवड (हाल) झाल्याचे चित्र सर्वत्र पाहन्यास मिळत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED