प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नाशिक जिल्हा कार्यकारीणी नियुक्ती पत्र वितरण सोहळा संपन्न

🔹पत्रकार बांधवाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करुया-प्रदेश सरचिटणीस नवनाथ गायकर यांचे आवाहन

✒️शांताराम दुनबळे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.5सप्टेंबर):- लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा पत्रकार बांधव हा समाजासाठी सातत्याने अविरत व अहोरात्र परिश्रम घेत असतो. प्रसंगी स्वतः चे कुंटुब, आरोग्य व अन्य बाबीकडे तो दुर्लक्ष करतो.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ही संघटना याच गोष्टीचे भान ठेवत काम करते.म्हणून संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी ही पत्रकार बांधवाचें हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करावे असे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी केले आहे.

नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने नाशिक येथील श्रीकृष्ण लाँन्स, द्वारका येथे आयोजित नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्ती पत्र वितरण व पदग्रहण सोहळयानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी व्यासपिठावर संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र साठे, महिला जिल्हाध्यक्ष प्रिया जैन, जिल्हा संपर्कप्रमुख साजीद शेख आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार व तणावमुक्त जीवन या विषयावर प्रजापती ब्रम्हकुमारी सेवा संघाचे वतीने पत्रकार बांधवांना तणाव मुक्त जीवनाचे महत्त्व, उपाय आदी विषयावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी यांनी आपल्या पुढील वाटचालीच्या योजना विशद करताना संघटना वाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

जिल्हा पदाधिकारी सोमनाथ क्षत्रिय, साजिद शेख व शरदचंद्र खैरनार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत आगामी काळात भरीव काम करण्याचे आश्वासन प्रदेश सरचिटणीस नवनाथ गायकर यांना दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बोरसे यांनी, सुत्रसंचालन शरदचंद्र खैरनार यांनी तर आभार जिल्हा संघटक मनोहर भावनाथ यांनी मानले.

कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस नवनाथ गायकर यांचेसह जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बोरसे, शरदचंद्र खैरनार, युवा अध्यक्ष सोमनाथ क्षत्रिय, महिला जिल्हाध्यक्ष प्रिया जैन, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र साठे, जिल्हा संपर्क प्रमुख साजीद शेख, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल खरे, जाहिद शेख, जिल्हा संघटक मनोहर भावनाथ, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप पाटील, अनिल केदारे, श्रीमती गायकवाड, ॲड.कांबळे आदीसह असंख्य पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED