रामा हेरिटेज हॉटेल मध्ये लागलेल्या आगीत हेड शेफचा गुदमरून मृत्यू आग विझल्या नंतर अर्धा तासाने सापडला मृतदेह

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.5सप्टेंबर):-नाशिक मुंबई नाका येथील रामा हेरिटेज हॉटेल च्या शोरूम ला च्या लागलेल्या आगीत हॉटेल हेड सेफ चा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली शुक्रवारी रात्री बारा वाजे सुमारास अचानक ही आग लागली या घटनेची माहिती मिळताच अग्नी शमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासाच्या शर्ती च्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

पण आग विजल्यानंतर तब्बल अर्ध्या तासांनी शेफचा मृतावस्थेत मृत देह मृतदेह सापडला त्यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला त्यांनी मृतदेह घेण्यास नकार दिला पण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवून नातेवाईकांना घटनेची सत्यता सांगितली त्यात कोठेही घातपात झाली.

नसल्याचे स्पष्ट झाले नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला या आगीत रुपेश रामदास गायकवाड 47 राहणार राणे नगर इंदिरा नगर असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे गायकवाड यांच्याकडे हॉटेल ची किचन जवाबदारी होती शुक्रवारी किचन शेजारी असलेल्या स्टोअर रूम मध्ये अचानक आग लागल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य झाल नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED