सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक संघटने मार्फत विविध उपक्रम

✒️संदीप मिठारी(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.5सप्टेंबर):-सडोली खा येथील सेवा निवृत्त जेष्ठ नागरिक संघटने मार्फत शिक्षक दिन व्यसनमुक्ती प्रतिज्ञे ने साजरा सडोली खा ता करवीर येथे सेवानिवृत्त लोकांची संघटना कार्यरत आहे. दर महिन्याला त्यांचा छोटेखाणी स्नेह मेळावा होतो. या अगोदर च्या कार्यक्रमात संघटनेचेने सेवा निवृत्त लोकांचा सत्कार, गुणिजन लोकांचा व कोविड योध्यानचा सन्मान, वृक्षारोपण, ग्रामसफाई, असे विविध उपक्रम घेतले आहेत.

5 सप्टेंबर या डॉ राधाकृष्णन यांच्या जन्म दिनी शिक्षक दिन साजरा करण्याचे ठरले. नियोजनाप्रमाणे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच अध्यापक एकनाथ कुंभार व प्राचार्य डॉ.विलास पाटील यांचा सत्कार व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी एकनाथ कुंभार यांनी नवीन पिढी व आपली विचार धारणा जुळत नाही. त्यांच्याशी कसे मिळते जुळते घ्यावे याचे हितगुज साधले. विलास पाटील यांनी स्वतःचे आरोग्य कसे जपावे याबद्दल कानमंत्र सांगितला.यावेळी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ म. गांधी व्यसन मुक्ती व्यसनमुक्ती राज्य पुरस्कार विजेते अध्यापक श्री एकनाथ कुंभार यांनी दिली.

यावेळी चित्र प्रदर्शन हि भरवण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बळवंत कुंभार हे होते. प्रास्ताविक मारुती साळोखे यांनी तर आभार मधुकर कुंभार यांनी मानले. यावेळी अध्यापकांनी सेवानिवृत्त सदस्यांना गांधी टोपी व श्रीफळ देऊन जेष्ठांचे आशीर्वाद घेतले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रा.पं.सदस्य श्री जयसिंग कुंभार, शिवाजी चव्हाण, सखाराम पाटील, शंकर पाटील,महादेव पोवार,नायकू कुंभार,संजय पाटील,बळवंत पाटील,संभाजी पाटील,महादेव मगदूम, मुख्याद्यापक श्री नेर्लेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED