आ.बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते जलपूजन

29

🔹देवीनिमगाव येथे नुकसानीची केली पाहणी

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.5सप्टेंबर):; तालुक्यात शनिवार रात्री म्हणजे ४ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून जवळपास सर्वच तलाव भरले आहेत.त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.शिराळ येथे नदीला अनेक वर्षानंतर मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्याचे तर धानोरा येथे ही कांबळी प्रकल्प पूर्णपणे भरला असल्याने या ठिकाणी आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आ.बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

यावेळी तहसिलदार राजाभाऊ कदम,माजी जि.प.अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत,तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,ज्येष्ठ नेते परमेश्वर काका शेळके,सुनील नाथ,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे,शिवाजी डोके,हरिभाऊ दहातोंडे,जगन्नाथ ढोबळे,बाबासाहेब शेंडगे,बाळासाहेब पिसाळ,पंढरीनाथ पारखे,जालिंदर वांढरे,औदुंबर खिलारे,शिवाजी शेकडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या दोन दिवसापासून आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे.या पावसामुळे आष्टी तालुक्यातील सर्व तलाव तुडुंब भरले असून सर्व नद्यांना पूर आला आहे.देवी निमगाव हा तलाव शंभर टक्के भरला असून नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नदीकाठच्या काही कुटुंबाच्या राहत्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या ठिकाणी आ.बाळासाहेब आजबे काका यांनी भेट देऊन त्यांचे तात्पुरते स्थलांतर येथील शाळेत करण्यात यावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

नुकसानग्रस्त कुटुंबियांच्या घराचे,पडझडीचे व परिसरातील शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्याना नुनसान भरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले,यावेळी तहसिलदार,प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.एकीकडे थोडेफार नुकसान होत असले तरी मात्र तालुक्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.तालुक्यामध्ये ठिक ठिकाणी आ.बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते जलपूजन करून शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.आज सकाळी ८ वाजता शिराळ व ९ वाजता धानोरा येथे आ.बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.यावेळी शिराळ,धानोरा येथील ग्रामस्थ तलाठी,ग्रामसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.