
✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)
गेवराई(दि.5सप्टेंबर):-वडगाव ढोक तालुका गेवराई परिसरात अतिवृष्टी झाली. रात्रभर मुसळधार पाऊस पडत राहिला त्यामुळे पूर्ण गाव जलमय झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील तीन वर्षांपासून वडगाव ढोक गावातील जवळून जाणाऱ्या नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाने याची दखल घेतली नाही.
याचा परिणाम म्हणजे तीन चार वर्षापूर्वी एका नागरिकाला बैल गाडी पुरात वाहून गेल्यामुळे दोन बैला चे प्राण गमवावे लागले होते. आता तरी प्रशासनाने जागे व्हावे. म्हणजे पुन्हा या घटना घडणार नाहीत.रानातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे संभतित ,महसूल विभाग आणि कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून घ्यावे. अशी विनंती करण्यात ग्रामपंचायत व गावकऱ्यां च्या वतीने करण्यात येत आहे