सुवर्णमहोत्सवी शाळेत शिक्षक दिनानिमित्त महामानवांना विनम्र अभिवादन.

26

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगांव(दि.5सप्टेबर):-२०२१ रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षणक्रांती चे जनक – थोर शिक्षणतज्ञ – राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची खरी देवता – सावित्रीबाई फुले, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करण्यात आले.

सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका एम.के. कापडणे, पर्यवेक्षक जे.एस.पवार, एम.बी.मोरे, यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची खरी देवता – सावित्रीमाई फुले, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे.एस.पवार, ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे, एम.बी.मोरे, सी.एम.भोळे, हेमंत माळी, पी. डी. पाटील सर्व शिक्षक बंधू भगिनी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.