प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांच्या मुळे शेतकऱ्यांचे पिक विमा नुकसान सुचना फॉर्म अडथळा असताना रयत मध्यस्थीने कृषी विभागामध्ये जमा

51

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

गेवराई(दि.5सप्टेंबर):-तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोंडा घास आलेला पिक पावसाने हिसकावून नेला त्यामुळे शेतकरी बांधवांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. परंतु त्यामुळे पिकांचे नुकसान सुचना फॉर्म घेण्यासाठी कृषी विभागाच्या तसेच विमा कंपनी प्रतिनिधी वतीने नाहक शेतकरी बांधवांना टाळाटाळ करीत होते. आणि शेतकऱ्यांना कृषी विभाग तसेच विमा कंपनी यांचे मध्ये कुठलाही समन्वय दिसून येत नव्हता वेगळ्या पद्धतीने भाषाचा वापर करीत असल्याचे व पिक विमा नुकसान भरपाई चे फॉर्म घेत नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी अनेक शेतकरी बांधवांनी रयत प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांना कॉल करून सांगितले.

आणि ताबडतोब कृषी विभाग कार्यालयात पोहोचले विमा कंपनी आणि कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या व्याथा समजवून सांगितले आणि पिक विमा नुकसान भरपाई चे फॉर्म तात्काळ जमा करून घ्या असे सांगून दोन्ही विभागात समन्वय घडून अनत त्यानंतर ताबडतोब कृषी अधिकारी यांनी फॉर्म जमा करण्याची प्रतिक्रिया सुरू केली. शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेल्यामुळे त्यांचा प्रश्न ताबडतोब मार्गी लागला. शेतकऱ्यांच्या सोबत तत्पर सोबत राहून आजपर्यंत अनेक प्रश्न मार्गी लागले.

शेतकरी हनुमंत चव्हाण, सतीश चव्हाण, प्रकाश चव्हाण , दादासाहेब चव्हाण, जगताप पुरुषोत्तम, रेवण नाना चव्हाण, तात्या कदम , लक्ष्मण कदम, नाना जाधव, राजेंद्र चव्हाण, आदी विविध गावातील शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देत शेतकरी बांधवांनी प्रदेश सरचिटणीस सुनील भाऊ ठोसर यांचे आभार मानले आपलाच नवनाथ भाऊ आडे यांनी प्रशिधीस दिलेल्या पत्रकात म्हटले लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष्य शेतकरी बांधवांना नुसते निवडणुकी पुरते वापरून त्यांच्या प्रश्नावर कोणीही लक्ष्य देत नसेल तर परत त्रास दिल्यास कार्यालयात पोळा साजरा करू असे आवाहन सुनील ठोसर यांनी सांगितले शेतकरी बांधवांनी घाबरु नका मी कायम पाठीशी आहे काही अडचण असल्यास संपर्क साधा, एसएमएस करा 9405799999,9763257007