शिक्षकदिना निमीत्त शिक्षकांचा सत्कार…

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.5सप्टेंबर):- तालुक्यातील कुंडलवाडी येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा नगरसेवक पंढरीनाथ दाचावार यांच्या निवासस्थानी ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध शाळेतील शिक्षकांचा प्रतिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला आहे.

याप्रसंगी सब्बनवार शाळेचे मुख्याध्यापक कल्याण गायकवाड, नागनाथ चटलुरे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक डी.पी. शेट्टीवार,मिलिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. एस. राठोड, सहशिक्षक वाघमारे, पांचाळ, माजिद नांदेडकर, सहशिक्षिका सौ. वंदना लापशेटवार आदी शिक्षकांचा दाचावार परीवाराकडून सत्कार करण्यात आले असुन यावेळी अॅड.अजय कुलकर्णी, तालुका संघचालक विश्वनाथ दाचावार,दिनेश दाचावार, राजू लापशेटवार, सौ. संगीता दाचावार, सौ. मंजुषा दाचावार, किशोर दाचावार आदी उपस्थिती होती.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED