भाईजी (राधेश्यामजी चांडक) म्हणजे सहकारातील पांडुरंग- आमदार श्र्वेताताई महाले

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.5सप्टेंबर):-सहकार चळवळ ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे. असे असतानाही पतसंस्थेवर कुणीही विश्वास ठेवत नव्हते त्यावेळी राधेश्यामजी चांडक यांनी बुलढाणा अर्बन नावाने पतसंस्था काढुन सहकार चळवळ सुरू केली आणि ही सहकार चळवळ त्यांनी केवळ जिल्ह्यापुरतीच मर्यादित न ठेवता अख्या आशिया खंडात पोहचवून बुलडाण्याचे नाव सगळीकडे पोहचवले ही बुलढाणाकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे . बुलडाणा अर्बनने आज 10 हजार कोटींची पल्ला गाढला . आज संपूर्ण सहकार चळवळ ही भाईजींच्या नावाने ओळखली जाते.

त्यामुळे भाईजी हे सहकार चळवळीतील पांडुरंग असल्याचे गौरवोद्गार आ सौ श्वेताताई महाले पाटिल यांनी राधेश्यामजी चांडक यांच्या सत्कार सोहळ्यात बोलतांना काढले.

दि 5 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. यांच्या वतीने बुलढाणा अर्बनने 10 हजार कोटींचा पल्ला गाठला त्यानिमित्ताने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सहकार विद्या मंदिर बुलढाणाच्या सभागृहात झालेल्या या भव्य कार्यक्रमाच्या वेळी मा श्री आ संजयजी रायमूलकर ,मा श्री आ रणधीरजी सावरकर, मा श्री सुरेश वाबळेजी अध्यक्ष मल्टिस्टेट पतसंस्था फेडरेशन ,मा श्री ओमप्रकाश काका साहेब कोयटे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन , मा श्री प्रकाश भाऊ पोहरे मुख्य संपादक देशोन्नती , मा श्री दादा रावजी तुपकर , मा श्री सुदर्शनजी भालेराव उपकार्याध्यक्ष , मा श्री शांतीलालजी शिंगी सहसचिव , मा श्री राजुदास जाधव कार्याध्यक्ष ,मा सौ कोमलताई झंवर अध्यक्षा बुलढाणा अर्बन , डॉ सुकेशजी झंवर मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा अर्बन , सौ सुरेखा लवांडे मॅडम यांच्यासह पतसंस्था चे अध्यक्ष ,संचालक तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED