पालकमंत्री नाम.वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत प्रकाश खोब्रागडे यांचा ब्रम्हपुरी शहरातील अनेक युवकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.5सप्टेंबर):-राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांच्या कार्यपद्धतीवर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवत ब्रम्हपुरी शहरातील अनेक युवकांनी तरुण नेतृत्व,युवा उद्योजक श्री प्रकाश खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली ४ सप्टेंबर रोजी शनिवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

समाजाला योग्य दिशा द्यायची असेल तर युवक वर्गाचे व्यवस्थित संघटन महत्त्वाचे आहे त्यासाठी युवक वर्गातून नेतृत्व निर्माण होणे गरजेचे आहे या महत्त्वाच्या बिंदूला हेरून ब्रम्हपुरी येथील विश्रामगृहात पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, नगरपरीषदेचे गटनेता विलास विखार, ब्रम्हपुरी शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक हितेंद्र राऊत, जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, नगरसेवक डॉ नितीन उराडे, नगरसेवक महेश भर्रे, जि.प.सदस्य स्मिताताई पारधी, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मंगलाताई लोनबले यांसह अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार म्हणाले कि, काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करू इच्छिणाऱ्या व पक्षप्रवेश केलेल्या सर्व युवकांचे स्वागत असुन काँग्रेस पक्ष हा युवकांना भरारी देण्याचे काम करीत असतो. सोबतच युवकांनी सुध्दा आता सक्रियपणे राजकारणात येऊन नेतृत्व करीत समाजाची सेवा केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.सदर पक्षप्रवेश हा ब्रम्हपुरी शहरातील युवा उद्योजक श्री प्रकाश खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.

यावेळी सचिन सुखदेवे, सुरज मेश्राम, शुभम चहांदे, मिलींद खोब्रागडे, सागर रामटेके, प्रितम चहांदे, निखिल सहारे, मंगेश विखार, रंजीत वैद्य, तेजस गीरीपुंजे, गोलु रामटेके, यश रामटेके, महेश देसाई, हिवराज दिघोरे, डाकराम शिवुरकार, रोशन करंबे, शंकर कुर्झैकर, विशाल बावनकुळे, कालिदास ठाकरे, गुड्डु काटेखाये, निखील रामटेके, अजय कुर्झेकार, नेमीचंद नागोसे, प्रल्हाद मेहेर, इमरान पठाण, क्रिष्णा धोटे, किशोर नागपुरे, अमोल अलोने, मनोज दुनेदार, गोलू बावनकुळे, कपील पाटील यांनी यावेळी पक्ष प्रवेश केला.

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED